shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पावसात भिजलेले मास्क घालून नागरिकांचे आरोग्य धोक्यात..! सरकारने सुधारित आदेश द्यावेत -प्रभाकर कोंढाळकर, राज्य सरचिटणीस, भारतीय जनसंसद..!

पुणे । विशेष प्रतिनिधी (शौकतभाई शेख):-
राज्यात करोना पसरू नये या साठी राज्य सरकार ने ब्रेक द चेन चे आदेश पारित केले जरी असले तरी सदर आदेश पावसाळ्या पूर्वी देण्यात आले आहे व यात पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने लोकांचे मास्क भिजू शकते या बाबत विचार करण्यात आला नाही.

परिणामी पालिका व पोलीस भिजलेले  मास्क  घालायचा फोर्स करत आहेत परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते याचा विचार व्हायला पाहिजे आणि त्वरित सुधारित आदेश काढून त्यात भिजलेले मास्क असल्यास नागरिकांनी काय करावे या बाबत सूचना असाव्यात या बाबत भारतीय जनसंसाद चे अध्यक्ष अशोक सबबन, सचिव  प्रभाकर कोंढाळकर , डॉ अभिषेक हरिदास यांनी गृह विभाग , पब्लिक हेथ ,पालिकेला तक्रारी दिल्या आहेत तसेच हमारा विश्व फौंडेशन अध्यक्ष अनिता अगरवाल व नितीन पटेकर यांनी आयुक्तांना पत्रव्यवहार करणार असल्याचे कळवले.
 
या बाबतीत डॉ अभिषेक हरिदास यांची आरोग्य मंत्री मा.राजेश टोपे साहेब यांच्याशी चर्चा देखील झाली आहे .मात्र आता जनहितार्थ काय आदेश पारित होतात हे पाहणे हितावह आहे 

close