आंबटगोड चवीची, पिवळ्या, केशरी रंगाची सगळ्यांच्या आवडीची अशी संत्री व्हिटमिन - सी ने. समृद्ध असतात. सर्वाधिक निर्मिती ही महाराष्ट्रांत नागपूर येथे होते.नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे.अनेक व्याधिंवर संत्री गुणकारी ठरतात ,भूक मंदावणे, पोटात गॕस होणे, अशा समस्यांवर संत्र्याचा रस प्यायल्यास आराम पडतो. मळमळल्यासारखे वाटल्यास संत्र्याची साल हुंगल्यास लगेच बरे वाटते.
🍊.माऊथ अल्सर , छाले, व्रण हे संत्र्याच्या सेवनाने बरे होतात, मुबलक प्रमाणात पोटॕशिअम, व मॕग्नेशिअम असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो, लहान मुलांना संत्री खाऊ घातल्यास त्यांचे शरीर मजबुत राहते, गर्भवती स्रियांनी नऊ महिने याचे प्राशन केल्यास होणारे मूल हेल्दी होते व प्रसूती देखील वेदना विना होते.
🍊.संत्र्याचं ताजं फूल बारीक करून त्याचा रस केसांना लावल्यास केसांची चमक वाढून केस काळे व घनदाट होतात.संत्र्याची साल वाळवून त्याचे चूर्ण व गुलाबजल मिसळून चेहऱ्याला लावल्यास चेहरा चमकतो. पिंपल, ब्लॕकहेड, सावळेपणा दूर होतो, संत्र्याचे नियमित सेवन केल्याने, दात व हिरड्या चांगल्या राहतात.
🍊 संत्र्यामध्ये अँटिआॕक्सिडंटस् अधिक प्रमाणात असतात जे कॕन्सरच्या प्रभावाला नष्ट करतात, संत्र्यात फोलेट तत्व अधिक असते. त्यामुळे शरीरात नवीन सेल लवकर तयार होऊन शरीरातील कोणतीही जखम लवकर भरते.फायबरचे उच्चतम प्रमाण असल्याने बद्धकोष्ठ, शौचास त्रास होणे हे आजार बरे होतात.
🍊 महत्त्वाचे म्हणजे हे एक सुगंधित फळ असल्याने
मानसिक ताण कमी करते व डिप्रेशनमधून बाहेर काढते. झिंक व आयर्न भरपूर खनिजे असल्याने
इम्यून सिस्टिम [ रोगप्रतिकारशक्ती ]मजबूत ठेवते. सांधेदुखीकरता याचा रस व बकरीचे दूध एकत्रित घेतल्यास फायदा होतो. मूतखडा देखील होऊ देत नाही संत्र्याच्या सालीचे चूर्ण घेतल्यास पोटात थंडावा तयार होऊन अम्लपित्त, व चर्मरोग होत नाही.
🍊 तापामध्ये पचनशक्ती मंदावते व त्यामूळे जीभेवर पांढरा थर जमा होतो, अशा स्थितित संत्रे आतील सालीसह चावून खावे. पचनशक्ति सुधारते. डोळ्याकरता गुणकारी आहे. नियमित सेवन केल्यास डोळ्यांची जळजळ उष्णता कमी होते, कांजण्या , गोवर येउन गेल्यावर उष्णता पूर्ण जाण्यासाठी संत्र्याचा रस पिण्यास द्यावा.
बाराही महिने मिळणारे हे फळ नेहमीच आहारात असावे.🍊🍊🍊

