बुधराणी हॉस्पिटल आणि आरोग्यम धनसंपदा फाऊंडेशन चा उल्लेखनीय उपक्रम..!!
प्रतिनिधी : संजय वायकर
करमाळा : (दि .२०) :आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना करमाळा तालुका शाखा आणि बुधरानी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 जून 2021 रोजी मोफत डोळे तपासणी शिबिर सुमंत नगर येथील संत गोरोबा कुंभार समाज मंदिर करमाळा येथे यशस्विरित्या पार पडले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसन कांबळे तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना करमाळा तालुका शाखा हे होते . तर प्रमुख पाहुण्या म्हणून वंदना कांबळे सामाजिक कार्यकर्त्या या उपस्थित होत्या.
करमाळा शहरातील नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला सिद्धार्थ नगर, रंभापुरा नंतर सुमंत नगर येथील हा तिसरा कार्यक्रम आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा कार्यक्रम संपूर्ण करमाळा शहरात नियोजनबद्ध राबवण्यात पुढाकार घेण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी संपर्क साधल्यास जास्तीत जास्त नागरिकांचा फायदा होईल असे किसन कांबळे यांनी यावेळी सांगितले.
गोरगरीबांच्या सेवेसाठी आरोग्यम् धनसंपदा फौंडेशन सध्याच्या कोरोना काळामध्ये पुढाकार घेत आहे या संधीचा फायदा सर्वांनी नक्कीच घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या वंदना कांबळे यांनी कार्यक्रमाच्या वेळी नागरिकांना केले .
कस्तुरबाई हरी देशमाने ,
नसीम अकबर मुलानी ,
दिगंबर दत्तू सरवदे ,
सिकंदर गणी सय्यद ,
बिस्मिल्ला हाशम सय्यद,
विजया लक्ष्मण कांबळे ,
मन्नाबी आदम सय्यद ,
गंगुबाई रामचंद्र कुंभार
यांच्या डोळ्याचे ऑपरेशन केले जाणार आहे .
लक्ष्मी युवराज बडेकर ,
शहानुर पठाण ,
रेहान इम्रान दारुवाले ,
छाया रतनचंद हिरण ,
सुनिता सोमनाथ जाधव ,
करिष्मा फकीर पठाण ,
काजल धर्मा माने ,
भाग्यश्री अरुण बडेकर ,
रेणुका भिमराव कांबळे , बाळासाहेब जाधव आदी 54 जणांनी या शिबीराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे नियोजन आणि सुत्रसंचालन जयवंत उर्फ आप्पा कांबळे यांनी केले .
सोशल डिस्टन्सींग च्या सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम यशस्विरित्या घेण्यात आला.

