shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग..!!


---------------------------------------- 

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :- 
केज तालुक्यातील दरडवाडी येथील

२५ वर्षीय सुनेने तिच्या ५० वर्षाच्या सासऱ्यानेच विनयभंग केला असल्याची तक्रार दिली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दरडवाडी ता. केज येथे दि. १२ जून शनिवार रोजी २५ वर्षीय विवाहिता ही तिच्या घरा समोरून शौचास जात असताना; तिचा ५० वर्ष वयाचा सख्खा चुलत सासरा याने तिचा पाठलाग करून वाईट हेतूने तिच्या हातात धरले. तसेच ती त्याला आवडते व ती कुठे जात आहे. असे म्हणाला आणि त्या पीडितेला व तिच्या नवऱ्याला मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. 

पीडितेची तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात तिच्या सख्ख्या चुलत सासऱ्याच्या विरुद्ध विनयभंग करून मारहाण करणे व जीवे मारण्याची धमकी देणे. या आरोपाखाली गु.र.नं. २८९/२०२१ भा.दं.वि. ३५४(ड), ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महिला पोलीस कॉन्स्टेबल रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.
------------------------------------------------------
close