प्रतिनिधी : आसावरी वायकर
उक्कडगाव (दि .१५ ) :गाव तिथे लसीकरण मोहिमेअंतर्गत आज नगर तालुक्यातील उक्कडगाव येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.
या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच नवनाथ म्हस्के,MO डॉ.अविनाश कांगुणे,चेअरमन चंद्रकांत शिंदे,ग्रा.प.सदस्य रविंद्र म्हस्के,संदीप काळे,प्रकाश शेळके,रविंद्र शिंदे,जयसिंग दळवी,बापू परकाळे,सागर शिंदे,संभाजी सावंत,मोरे सर,बाळासाहेब तिपुळे,माऊली म्हस्के,सतिष साठे तसेच CHO डॉ.पूनम दातीर,MPW अनिल रायपिल्ले,आरोग्य सहा.डेव्हिड वाघमारे,सुनीता बिडवे सिस्टर,सरोजिनी देठे सिस्टर,ग्रामसेवक देहाडे भाऊसाहेब,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

