shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नारायणडोहो येथे गाव तिथे लसीकरण कँम्प आयोजन..!

नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
गाव तिथे लसिकरण मोहिमेअंतर्गत नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे पंचायत समितीचे मा.सभापती प्रविण कोकाटे यांच्या नियोजनातून वय वर्षं ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन तसेच आरटीपीसी टेस्ट कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व उपसभापती डॉ.दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच किशोर गायकवाड,उपसरपंच पोपटराव बनकर,पोपटराव साठे,अशोककाका साठे,ग्रामपंचायत सदस्य अविनाश साठे,ज्ञानेश्वर साठे,प्रकाश म्हस्के,बाबासाहेब साठे,देविदास साठे, रेवन्नाथ शिंदे,अनिल गर्जे,सुरेश साठे, सुभाष साठे हे उपस्थित होते.हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी समुदाय आरोग अधिकारी डॉ.अविनाश कांगुने, वैद्यकीय अधिकारी डॉ.पुनम दातीर,सुपरव्हायजर सरोजिनी देठे, सुनिता बिडवे,आरोग्यसेवक अनिल रायपिल्ले,डेव्हिड वाघमारे,ग्रामसेवक भोंडवे भाऊसाहेब,तलाठी वाबळे मॅडम,आशा सुपरवायझर सुनिता साठे,आशा सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि  ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
close