shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय सैन्य दलातील सुभेदार मेजर लेफ्टनंट मोहारे बाळासाहेब पांडुरंग सेवानिवृत्त झाल्याने लष्कराने जंगी मिरवणूक काढून सन्मान पुर्वक निरोप दिला..!!

नगर प्रतिनिधी ।  (शिवा म्हस्के):

श्रीगोंदा तालुक्यातील एका छोट्याशा खेडे गाव कोरेगाव येथील बाळासाहेब पांडुरंग मोहारे भारतीय सैन्य दलात भरती होऊन आज सुभेदार मेजर आ.लेफ्टनंट या पदावरून आज दि30 जुन रोजी सेवानिवृत्त झाले आहे. त्यांनी  या पदा पर्यंत  जाण्यासाठी  खुप अग्नी परिक्षा द्यावा लागतात. जिद्द चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्य दलातील सर्वोउत्तम‌ फोर्स मध्ये दाखल  होऊन सैन्य दलातील अनेक खडतर प्रशिक्षण घेऊन 21 पारा  कमांडो स्पेशल फोर्स या पदांवर कार्यरत होते. या पदांवर  काम करणे म्हणजे अत्यंत धाडसी काम असते. 







विमानातून जप करून आपल्या इच्छित स्थळी जाऊन कारवाई करून परत आपल्या कँम्प मध्ये परत येणे  त्यांनी ह्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. सैन्य दलात कार्यरत असताना अनेक देशभरातील अधिकारी जवना असतात पण सैन्य दलातील प्रेम शिस्ती पुढे सर्व एक समान असतात. व जिवा भावाचे मित्रा प्रमाणे सर्व जण मिळून असतात.  आपल्या कुटूंब पासून हजारो ‌किलोमिटर दुर राहुन देश सेवे साठी आपल सदैव मरण तळ हातावर असते.  

मर मिटने को या मारणे साठी तयार असाव लागत.या वेळी सुभेदार  लेफ्टनंट बाळासाहेब मोहारे यांनी आपल्या बालपणी शिक्षका मागदर्शन व आपले आई-वडील आज नाही पण माझ्या बाला वयात चांगले संस्कार व शिक्षण साठी नेहमी तत्पर व कष्ट करत होते‌.आज माझ्या आई व वडील माझे शिक्षक व दलात कार्यरत असताना अनेकाचे  मागदर्शन लाभल्यामुळे आज मी सैन्य दलातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडुन आज मला भारतीय सैन्य दलातील अधिकारी जवानांनी मला मोठ्या सण उत्सव प्रमाणे मला सन्मान पुर्वक सेवानिवृत्तीचा   निरोप दिला आहे. मोहारे बाळासाहेब यांनी खास नगर शिर्डी एक्सप्रेसशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

close