shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

४५ वर्षांवरील नागरिकांना घरी लस द्या हज आणि उमरा यात्रेकरूंचेही लसीकरण करा..!


उम्मती फाउंडेशनसह बागवान, आतार, तांबोळी, कुरेशी, समाजांच्या प्रमुखांची मागणी..!
श्रीरामपूर - सोलापूर महापालिकेच्या धर्तीवर श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाने ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांच्या लसीकरनासाठी शहरात तातडीने विशेष मोहीम राबवावी, तसेच परदेशात हज आणि उमरा यात्रेसाठी जाणार्याल यात्रेकरूंचेही खास बाब म्हणून सत्वर लसीकरण करावे, अशी मागणी उम्मती फाउंडेशन च्या पदाधिकार्यांनसह बागवान, आतार, तांबोळी, कुरेशी, रंगरेज, अन्सारी, नालबंद समाजांच्या प्रमुखांनी केली आहे. 

अल्प संख्यांक मंत्री नवाब मलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी डॉ.  राजेंद्र भोसले यांना ई- मेलद्वारा पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर महानगर पालिका प्रशासनाने ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी शहरात विशेष मोहीम राबवत  ऑनलाइन नोंदणी करून त्यांना घरी लस देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या मोहिमेसाठी सोलापूर महापालिकेने शिक्षकांची नियुक्ती केली आहे.

शहरात ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांचे लसीकरण ते केंद्रात न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांची नावे शोधून, त्यांच्या घरापर्यंत जाऊन आॅनलाइन नोंदणी करून ही लस ते उपलब्ध करून देनार आहेत. याचा सर्व्हे करण्यासठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने मोहीम राबवावी. तसेच नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही उम्मती फाउंडेशनच्या पदाधिकार्यांकसह बागवान, आतार, तांबोळी, कुरेशी, रंगरेज, अन्सारी, नालबंद समाजांच्या प्रमुखांनी केली आहे. 

  या स्तुत्य उपक्रमाची श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने अमलबजावणी करुन ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, पालिकेने ही मोहीम हाती घेतल्यास या निर्णयाचे स्वागत करू, असे उम्मती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल दारूवाला, फिरोज पठाण, इंजि. जाहेद शेख, नगर सेवक हाजी मुख्तार शाह, ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनयझेशनचे जिल्हा अध्यक्ष हाजी फय्याज बागवान, जिल्हा संघटक शफीक बागवान, राहुरी तालुकाध्यक्ष अतीक बागवान, बेलापुर शहराध्यक्ष अनिस तांबोळी, मक्का मशिदीचे विश्वस्त नजीरभाई मुलाणी, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि माजी नगरसेवक हाजी रज्जाकभाई बागवान, हाजी रफीक बागवान, अकबरभाई बागवान, रफीक बागवान, जाकीरहुसेन बागवान, शफीक आतार, फरीद तांबोळी, मुस्लीम खाटिक समाज सेवा संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी इब्राहीम कुरेशी, अबुभाई कुरेशी, इस्माईल बागवान, असिफ पिंजारी, अहमद रंगरेज, मुसा रंगरेज, आलम तांबोळी, दादाभाई  अन्सारी, आदींनी केली आहे.
close