shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मनसे भाजपा यांनी समाजापुढे आदर्श ठेवत दिले उल्लेखनीय योगदान..!!

मूलभूत सुविधा उपलब्ध करून डोंबारी समाजाला केली मदत..!!

प्रतिनिधी : आसावरी वायकर
शेवगाव (दि .९) :शहरापासून दूर असलेल्या डोंबारी समाजातील कसरतीचे प्रयोग करून आपली उपजिवीका भागवणारा डोंबारी समाज...आणि विकासकामापासून वंचित असलेला समाज आणि ही वस्ती . मताची भिक मागण्या करिता याठिकाणी अनेक राजकारणी जातात पण यांच्या सोई सुविधांकडे कायम दु्र्लक्ष केले गेले. 


गेल्या काही दिवसांपूर्वी इथल्या अनेक कामाकरिता वाचा फुटली ती म्हणजे विजेचा प्रश्न . याबाबत कुठल्याही प्रकारचा पक्ष न पहाता भाजपा नगराध्यक्षाचे पती विनोद मोहिते, जेष्ठ नेते बंडूशेठ रासने, बालासाहेब गायकवाड, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा केला .यातून सुमारे ३० ते ३५ लाख रुपये खर्चून याठिकाणचा वीजेचा प्रश्न मार्गी लागला .यात कमी पडलेले १० विजेचे पोल श्री.नंदूभाऊ मुंढे यानीं स्वखर्चातून दिले. पुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला यावर श्री.नंदूभाऊ मुंढे यांनी बोअर घेऊन दिला. 

शिवजंयती निमित्त  येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मनसेच्या वतीने करण्यात आले. आज इथे असलेल्या बोअरला मोटार बसवून, पाण्याची टाकी बसविण्यात आली यासाठी शेवगावच्या तहसिलदार अर्चना भाकड पागिरे, दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी अनिलराव साठे यांनी आर्थिक योगदान दिले. 

आज  तहसिलदार अर्चना भाकड - पागिरे यांनी या डोंबारी वस्तीला भेट दिली . येथील नागरिकांशी संवाद साधला . त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . या कामाचे उद्घाटन केले. यावेळी डोंबारी समाजाच्या वतीने तहसिलदार अर्चना भाकड -पागिरे यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

 या कामाची आठवण म्हणुन तहसिलदार अर्चना भाकड - पागिरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


सामाजिक बांधिलकी जपत सर्व पक्षांनी राजकारण बाजुला ठेवुन विविधी मुलभूत सुविधा पासून वंचित भागात सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत असे समाजाला आवाहन करत मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले .

सर्व स्तरातून या कार्याचे कौतुक होतआहे .
close