प्रतिनिधी :आसावरी वायकर
अ .नगर : (दि.१८) :
"या वाऱ्याच्या बसुनी विमानी
सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया
शाळा चांदोबा गुरुजींची".
आज जागतिक सहल दिन म्हणजे पिकनिक डे .सहल म्हटलं की कोणाच्याही उत्साहाला उधाण आणणारा शब्द .सहली चे नाव जरा आधुनिक झाले आउटींग शब्द मात्र जास्तच भाव मारतो .
आमच्या वेळची सहल फार काही वेगळे नव्हती बर का! पण जास्त ऐतिहासिक वस्तू वास्तु याकडे जाणारी होती.
शिवनेरी किल्ला अगदी ठरलेला. महाबळेश्वरचा सनराइज् आणि सन सेट म्हणजे अफलातून..
सहल पुण्याला निघाली म्हणजे कात्रज चे प्राणी संग्रहालय स्नेक पार्क सारसबाग अगदी ठरलेले ठिकाणं. सहल शब्दाची अनाउन्समेंट झाली की अभ्यास पूर्णपणे दुर्लक्षित व्हायचा . मैत्रिणींचा ग्रुप लगेच तयार .कोण कोण शेजारी बसणार खिडकीत कोण बसणार खाऊ काय आणायचा शॉपिंग साठी पैसे किती घ्यायचे . शॉपिंगला आई-वडीलही कधी नाही म्हणाले नाहीत. सहल ऐवजी ट्रीप स्टडी टूर फिल्ड विजिट असे शब्द आले खरे पण भटकण्याची मजा मात्र औरच राहिली.
सहल शब्दातच आनंद मस्ती स्वातंत्र्य मोकळेपणा सगळच दडलंय. आज सगळी मुलं सहल गॅदरिंग मैदानावरचे धूम वर्गातील मस्ती विसरून गेलेत . नाही नाही त्यांना सक्तीनं घरी बसवलंय.
हे परमेश्वरा निसर्ग दाता प्लीज आमच्या सगळ्या मुलांना घराबाहेर येऊ दे मोकळा श्वास घेऊ दे खरच आम्ही आता बदलत आहोत.
आमची मस्ती भांडण कमी झालेत आम्हाला आधी सारखे जगू दे. आमची जिज्ञासा शक्ती प्लीज थांबवू नकोस. आमचं कुतूहल फक्त घरापुरतं नको . आम्हाला प्रश्न विचारण्याचे विचार मनात येण्यासाठी आम्हाला बाहेर पडू दे. हे निसर्ग राजा ,तूच विधाता आहेस. तुझ्या पुढे आम्ही खरच नम आहोत. आतातरी प्रार्थना ऐक ना .आम्हाला बघू दे ना आकाशाचा रंग, मस्त मस्त इंद्रधनुष्य पक्षांची किलबिल उसळणाऱ्या वाऱ्याची लहर.
आम्ही आता स्वतःला शिस्त लावून घेऊ सहलीला जाताना प्लास्टिकचा वापर अजिबात करणार नाही निसर्गाला त्रास होईल असे वागणार नाही.
मुलांनो हरवलात ना सहलीच्या आठवणीत सांगा ना रे घरातल्यांना शेजारच्यांना काय तर पर्यावरणाचे धडे.... आपसातले वाद थांबवा म्हणून कारण खरच निसर्ग नाराज झालाय मुलांनो आपल्यावर . आपण एक काम करूयात. रात्री झोपताना निसर्गाला , धरणी मातेला सर्वांना नमस्कार करून झोपायचे. निसर्गाची क्षमा मागूयात .झाडांची काळजी घेऊयात .आजूबाजूचा परिसर कचरामुक्त करूयात.
मुलांनो ,खरंच काळजी करू नका टेन्शन तर मुळीच घेऊ नका .आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती ही खूप मोठी ताकद आहे तिलाच सांभाळा . त्यासाठी एकच करायचं अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईलचा वापर कमी करायचा मग? उठा ! मोठ्याने एखादा डायलॉग म्हणा बाबांची नकल करा छोट्या बहिणीला मस्त नाचून दाखवा.
बघा खरंच खूप छान वाटेल.
सहली सारखी मजा सध्या घरात घेता येईल करणार का प्रयत्न?
अनुरिता झगडे.
श्री रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर

