shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद अहमदनगर मार्फत शेवगाव तालुक्यासाठी सहा रुग्ण वाहिका पंचायत समिती शेवगांव मध्ये लोकार्पण सोहळा संपन्न..!!

नगर प्रतिनिधी: ( शिवा म्हस्के)
जिल्हा परिषद अहमदनगर मार्फत शेवगाव तालुक्यासाठी सहा रुग्ण वाहिका पंचायत समिती शेवगांव मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा  सौ.राजश्रीताई घुले यांच्या हस्ते तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत काल  पंचायत समिती शेवगाव  येथे  रुग्ण वाहिका वितरण सोहळा साजरा झाला.

कोरोना कोव्हीड च्या भीषण परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची मोठ्या शहरात उपचारासाठी जाण्या येण्याची मोठी अडचण लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून शेवगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. 

या सोहळ्यास पंचायत समितीचे सभापती  सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील ज्ञानेश्वर चे जेष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे माजी सभापती अरूण पा.लांडे ,  संजय  कोळगे जि.प.सदस्य रामभाऊ साळवे,जि प सदस्यां संगिता  दुसंगे,संजय फडके पंडित भोसले, शिवाजीराव नेमाणे, सर्व पंचायत समितीचे सदस्य व तालुक्यातील सरपंच ,उपसरपंच, गटविकास अधिकारी महेशजी डोके साहेब,तालुका आरोग्य आधिकारी डाॅ ‌.कानडे सर व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी,पंचायत समिती येथील कर्मचारी उपस्थित होते.रुगण सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सोय होणार आहे.
अत्यावश्यक सेवेला  बळकटी मिळाली आहे.
close