( लोकप्रतिनिधी आहेत तरी कशाला ?)
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
तालुक्यातील जवळबन गावाला जोडणारे 3 मुख्य रस्ते गत 10 वर्षांपासून अत्यंत खराब झाले असून प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. वयोवृद्ध नागरिक, गर्भवती महिला यांना या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी याकडे जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत.
गावातील शेतकऱ्यांची शेतमाल, नागरिकांना दवाखान्यात जाण्यासाठी जात असताना अनेकांचा रस्त्यात मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत जवळ बंद करणे अनेक वेळा आंदोलन उपोषण निवेदन करून ही लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत दुचाकी धारक, प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक ,मालवाहतुक करणारे टेम्पो, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रॉली सह मालक, चालक,वयोवृद्ध नागरिक, आक्रमक आंदोलनाची तयारी करत असल्याची माहिती नागरिकांनी दिली
----------------
लोकप्रतिनिधींनी या रस्त्याने एकदा जावे
स्थानिक लोकप्रतिनिधी एकदा निवडून आल्यानंतर या रस्त्याने फिरकतही नाहीत रोज ये-जा करताना नागरिकांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत अपघातांमध्ये अनेकांचे जीव जात आहेत या रस्त्याने लोकप्रतिनिधी एकदा जावे
स्थानिक रहिवाशी सुग्रीव करपे व दादासाहेब भाकरे ( पाटील) जवळबन.
--------–---------
ग्रामपंचायत कडून अनेक वेळा पत्रव्यवहार केले रस्त्याच्या संदर्भात मागणी केली मात्र सर्व लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत
सरपंच शिवाजी शिंपले जवळबन.

