प्रतिनिधी । आसावरी वायकर
हरी हरी वसुंधरा पे
नीला नीला ये गगन
के जिस्पे बादलों की
पालकी उडा रहा पवन
दिशाये देखो रंगभरी
चमक रही उमंग भरी
ये किस्ने फुल फुल पे
किया सिंगार है
ये कौन चित्रकार है
ये कौन चित्रकार।
५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.
१९७२ साली युनोच्या सर्वसाधारण सभेने मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले.
पर्यावरण शब्दासाठी अधिक खोलवर जाण्याची तशी गरज नाही प्रॅक्टिकली आपण पर्यावरण बघूया. आपल्या सभोवताली असलेले वातावरणातील जैविक व अजैविक घटक म्हणजे पर्यावरण असा अगदी सोपा अर्थ घेऊ .
ज्यांना खरोखरच पर्यावरण प्रती आपुलकी आहे अशी 'इको-एको' संस्था मुंबईत कार्यरत आहे. आस या संस्थेशी जगभरातील अनेक देशांमधून ४५० सभासद जोडले गेले आहेत. खरोखरच या संस्थेच्या माध्यमातून वनविभागाच्या मदतीने एक कार्यपद्धती निश्चित करून लोकांमध्ये पर्यावरण आपत्ती जनजागृती करण्याचे काम सुरू आहे ही फार मोठी जमेची बाजू आहे.
अशा प्रकारच्या अनेक संस्था पुढे येऊन काम करत आहेत. पर्यावरणातील प्रत्येक घटक आज आपल्याला वाचवायचा आहे. एकीकडे पर्यावरणाची भाषा करायची आणि दुसरीकडे झाडे कापणे, नैसर्गिक घटकातील प्राणी व सूक्ष्मजीव यांना नष्ट करायचे. कुठे आहोत? याचा गांभीर्याने विचार करायला हवा .
अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मानवी कृती ही पर्यावरणाला धरून आहे का? बाटलीतले पाणी आम्ही सहज ओतून देतो तेच पाणी एखाद्या छोट्याशा रोपट्याला देऊयात रस्त्यावरच्या प्राण्याला देऊयात यासाठी फार काही नाही करायचे तर फक्त दोन मिनिटे देऊन हे काम करायचे. जमेल आपल्याला? खूप लोक पर्यावरणाच्या दिवशी छान जागे होतात मस्त कपडे घालतात फोटोसाठी खड्डा खणल्याचा आवडतात झाडे लावा झाडे जगवा अशी भाषणे ठोकतात खरंच भाऊ तुम्ही हे मनापासून करताय का हा एकदा तरी विचार करा जरा ..
कोविड ने मरण पावलेले कित्येक रुग्ण नदीच्या किनारी काही पाण्यात सापडले खरंच का रे दादा हे पर्यावरणाचे प्रेम? भाषण ठोकून मोठमोठ्या गप्पा करून उपयोग नाही. जोपर्यंत भावनात्मक मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही कचरा अगदी साधी गोष्ट पण आम्ही कधीच वर्गीकरण करून टाकणार नाही.
जणू काही आम्ही सर्व देशवासियांनी आम्ही बदलणार नाही देशालाही बदलू देणार नाही अशी शपथच घेतली आहे. खरेच जाणीव जागृती करणारे असाल जनजागृती करणारे असाल तर का थुंकता रे? का अगदी सहजपणे मास्क रस्त्यावर फेकता रे? आपल्याला काहीही वाटत नाही की कोणालातरी कदाचित मुक्या जीवाला छोट्या बच्चू ला धोका होऊ शकतो.
दादा, भाऊ, ताई ,मावशी, बाळांनो सगळे जागे होऊयात . आपल्या वसुंधरेला वाचवू यात तिला हिरव्या शालूने नटवूयात. तिला सुध्दा मानवा सारखाच जगण्याचा अधिकार आहे ही जाणीव पुन्हा पुन्हा होऊ द्यात.
100% बदल कधीच होणार नाही पण निदान एक टक्का तरी बदलण्याचा बदलवण्याचा प्रयत्न करूयात.
या पृथ्वीला वाचवू यात चला किमान आपल्या स्वार्थासाठी एक तरी झाड आपल्या दारात कुंडीत लावूयात .
(अनुरिता झगडे यांच्या लेखनीतून .. )

