shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनई आरोग्य केंद्रातील लसीच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोग्य मंञ्याकडे दाद मागणार .. !सामाजिक कार्यकर्ता संदीप कुसळकर ..!

सोनई । प्रतिनिधी( मोहन शेगर ):
गेल्या काही दिवसापुर्वी सोनई आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या कोरोना लसीकरणाच्या गैरव्यवहार आरोप प्रकरणी राज्याचे आरोग्यमंञी नाम.राजेश टोपें यांच्याकडे न्याय मागणार असल्याचे सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप कुसळकर व अनिल निमसे यांनी "दै.शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह" वृत्तसेवेशी बोलताना सांगितले.

याबाबत हकिकत अशी कि सोनई आरोग्य केंद्रात दिली जाणारी कोरोना प्रतिबंधात्मक लस सोनई प्राथमिक आरोग्य अधिकारी यांच्या आदेशाने आरोग्य केंद्रा बाहेर शनिशिंगणापूर येथे जावून काही ओळखीच्या माणसाला दिली जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन सामाजिक कार्यकर्ते अनिल निमसे यांनी केले होते. या प्रकरणी त्यांनी सोनई पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.याबाबत सोनई पोलिस स्टेशनने तालुका कोरोना समितीचे प्रमुख तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी,गटविकास अधिकारी यांच्या समितीकडे चौकशीसाठी सदर प्रकरण पाठवले होते. तरी घटना होवून विस दिवस उलटुन गेले तरी अजुन पर्यंत या चौकशी समितीने कुठल्याही प्रकारची दखल सदर तक्रारीची घेतली नसून तसेच आपले म्हणणे मांडण्यास सुदधा सदर तक्रारदारास बोलावण्यात आले नसल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी चौकशी समितीकडे विचारणा केली असता थातुर मातुर उत्तर तक्रारदारास देण्यात येत असल्याचे सदर लस गैरव्यवहार प्रकरण दाबण्यात तर येत नाही असा संशय तक्रारदारास असून याप्रकरणी आता त्यांनी थेट राज्याचे  आरोग्यमंञी नाम.राजेश टोपे यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगितले. सोनई आरोग्य केंद्रातील गैरव्यवहार प्रकरणाचे तक्रार निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंञी नाम.उद्धवजी ठाकरे,आरोग्यमंञी नाम.राजेश टोपे,जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे, जिल्हाधिकारी अहमदनगर, तहसिलदार नेवासा, आरोग्यधिकारी नेवासा येथे  सादर केल्या आहेत.
 
याबाबत तक्रारदाराचे म्हणणे आहे कि, आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सदर विषयांकित तक्रार अर्ज दिला आहे. परंतु संबधित जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अजुन आम्हांला समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे माहिती अधिकार टाकून लसीचा कोटा किती आला व किती जणांना दिला गेला. कोरोना टेस्ट किट किती आल्या व टेस्टिंग रिपोर्ट किती झाल्या तसेच औषधाचा साठा किती आला याची संपूर्ण माहिती मागितली असता अजुन माहिती देण्यास सोनई आरोग्य केंद्र बेफिकिरी दाखवत टाळाटाळ करत आहे.

सदर आरोग्य केंद्रात औषधे व इंजेक्शन देण्यास रूग्णास टाळाटाळ केली जात असल्याचा  आरोप आहे.तसेच येथील आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ.राजेंद्र कसबे यांच्या बाबत अनेकांच्या तक्रारी असताना देखील गेल्या अनेक वर्षापासुन सोनई येथेच कार्यरत का असुन त्यांची बदली का होत नाही अशी तक्रार निवेदनात करण्यात आली असून याप्रकरणी आता तालुका,जिल्हापातळीवर चौकशीचा विषय गोलमाल होत असून आता आम्ही थेट आरोग्यमंञी नाम.राजेश टोपे याच्याकडे दाद मागणार आहोत असे तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संदिप कुसळकर व अनिल निमसे यांनी सांगितले आहे.

संदिप कुसळकर , सामाजिक कार्यकर्ते

"सोनई आरोग्य केंद्राकडे माहिती अधिकारात माहिती मागितली असता अजून आम्हांला याबाबत माहिती मिळाली नाही.जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांच्या प्रयत्नाने आलेली ॲम्ब्युलन्स आरोग्यधिकारी वापरत असून ते वाहन अहमदनगर येथेच संबंधित अधिकारी ठेवत असल्याने रूग्णाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.अनेक वर्षापासून एकाच आरोग्य केंद्रात हे आरोग्यधिकारी चिकटून असून यांची बदली का होत नाही...? या बाबतीत सदर आरोग्य अधिकारी यांची खाते निहाय सखोल चौकशी होऊन तो अहवाल सार्वजनिक प्रसिद्धीसाठी आम्हांला तातडीने मिळाणेसाठी तसेच लसीच्या गैरव्यवहार बाबत आता आरोग्यमंञ्याकडे दाद मागणार आहोत-सामाजिक कार्यकर्ते संदिप कुसळकर सोनई.


गेल्या काही दिवसापुर्वी आम्ही सोनई आरोग्य केंद्रातुन कोरोना लस अवैध रित्या बाहेर नेवून दिली जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन केले होते. याबाबत तक्रार सोनई पोलिस स्टेशनला त्याचवेळी दिली होती.यावर चौकशी समिती नेमली असता यावर अजुन काही कारवाई झाली नसून आम्हाला अजुन चौकशी समिती समोर म्हणणे मांडण्यास सुद्धा बोलवण्यात आले नसून याबाबत सारी यंञणा आलबेल असल्याचे आढळून येत असून याप्रकरणी आता आरोग्यमंञी नाम.राजेश टोपेंकडे न्याय मागणार आहोत -सामाजिक कार्यकर्ते अनिल निमसे सोनई.
close