shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक योग दिनानिमित्त करमाळ्यात भाजपा व पतंजली योग समितीच्या वतीने योग शिबीर संपन्न..!!



प्रतिनिधी : संतोष वायकर

करमाळा:- (दि .२१) : भारतीय जनता पार्टी, करमाळा व पतंजली योग पीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 
जागतिक योग दिना निमित्त योगा आणि प्राणायाम चे आयोजन 21 जून 2021 रोजी सकाळी 6 वाजता श्री दत्त मंदिर विकास नगर,करमाळा येथे करण्यात आले.


योगाभ्यास हे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याचे प्रभावी साधन म्हणून सिद्ध झाले आहे. भारतीय संस्कृतीची ही महान परंपरा आता जगभरातील जवळपास 200 देशांनीही स्वीकारली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व मनाचे सामर्थ्य वाढविणे यांसाठी योगसाधना उपयुक्त आहे असे मत पतंजली योग समितीचे योगगुरू हनुमान सिंग परदेशी यांनी व्यक्त केले.


योग विद्येचा प्रसार व्हावा आणि योगाचे महत्व सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचावे यासाठी योगा आणि प्राणायाम महत्त्वाचा आहे. 


भारताचा योग आज संपूर्ण जगामध्ये पोचला आहे, कोरोना सारख्या महाभयंकर महामारी मध्ये निरोगी जीवन जगायचे असेल तर योगा उत्तम पर्याय आहे.

याप्रसंगी शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे,रेल्वे बोर्डचे दीपक चव्हाण,पतंजली चे हनुमानसिंह परदेशी, नरेंद्रसिंह ठाकूर, व्यापारी आघाडी अध्यक्ष जितेश कटारिया, गणेश वाशिंबेकर,मयुर देवी, प्रवीण देवी ,प्रदीप वीर, राजेंद्र वशिंबेकर, रामचंद्र कदम, जीवनकुमार संचेती, प्रवीण परदेशी, अजित नरसाळे, पंडित गुरुजी आदींसह नागरिक उपस्थित होते.
close