केजच्या उपजिल्हा रुग्णालयात चालतो धक्कादायक प्रकार.....
प्रसूती वॉर्डातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यारी उकळतात रुग्णांकडून पैसे..!!
----------------------------------------
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केजच्या उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक आणि चीड येणारे प्रकार समोर येत असून येथील कर्मचाऱ्यानी एका प्रसूती झालेल्या महिलेला तिने पैसे न दिल्याच्या कारणा वरून मारहाण व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र या गरीब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना धमक्या दिल्या जात असल्याने कुणी तक्रारीसाठी पुढे येत नाहीत.
केज उपजिल्हा रुग्णालयात सर्व सामान्य, आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि गरीब रुग्णासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. गरोदर मातांना प्रसूतीसाठी येथे भरती केले जात आहे. मात्र अत्यंत घृणास्पद आणि चीड आणणारी बाब अशी की प्रसूती कक्षातील रुग्णांच्या नातेवाइकाकडून येथील चतुर्थश्रेणी कर्मचारी हे वेगवेगळ्या कारणाने पैसे वसुली करीत आहेत. रुग्णांच्या त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. जे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक पैसे देण्यास असमर्थ असतील त्यांना शिवीगाळ करतात तसे प्रसंगी मारहाण व धक्काबुक्की देखील केली जात असल्याची अत्यंत गुप्त माहिती एका विश्वासनीय सूत्राकडून मिळाली आहे. प्रयोगशाळेत रक्त नमुने आणि वेगवेगळ्या चाचण्या व तपासणीच्या नावाखाली हे चतुर्थश्रेणी महिला कर्मचारी हे गरोदर मातांना चालता येणेही शक्य नसल्याने त्यांना प्रयोगशाळेत पाठवतात. त्यामुळे रस्त्यात किंवा पायर्यांची चढ-उतार करताना गरोदर मातांची रस्त्यातच प्रसूती होऊन अपघात देखील घडण्याची शक्यता आहे. मागच्या मागील आठवड्यात अशाच एका गरोदर मातेची रुग्णालयाच्या स्वच्छतागृहा जवळ प्रसूती झाल्याची घटना घडून देखील त्याठिकाणी एकही कर्मचारी बराच वेळ गेलेला नव्हता. त्याच बरोबर तपासण्या व चाचण्यांच्या नावाखाली हे वार्डातील कर्मचारी पैशाची मागणी करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करीत आहेत.
दरम्यान अशा या अरेरावी करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमुळे उपजिल्हा रुग्णालयाची बदनामी होत असून वैद्यकीय अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या कक्षातील अशा बेमुर्वतखोर कर्मचाऱ्यावर चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची व मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.
--------------------------------------------------
" सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या असून या बाबत लेखी पत्र दिले जाणार आहे. गैरप्रकार निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल "
--- डॉ. संजय राऊत
(वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, केज)
--------------------------------------------------
=} प्रसूती वार्डातील गरोदर मातांना प्रयोग शाळेत जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून आता सर्व नमुने वार्डातच घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
------------------------------------------------
=} महा लॅबकडे पाठविलेले अनेक नमुने याचा रिपोर्ट येत नाहीत तसेच अनेक वेळा हे नमुने "not received sampl " असा संदेश येतो म्हणजे मग तपासणीसाठी दिलेले नमुने जातात कुठे? याचीही चौकशी व्ह्यायला हवी.

