शैक्षणिक दाखले शिबिराचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा: ऋतुराज माने..
प्रतिनिधी : आसावरी वायकर
कोल्हापूर (दि .२७) : नवीन शैक्षणिक वर्ष पुढील महिन्यापासून सुरू होत आहे यामुळे मराठा ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत शैक्षणिक दाखले शिबिर घेण्यात आले याची सुरुवात आज सायबर चौक येथील विद्यार्थी सहाय्यता केंद्र आजी-माजी विद्यार्थी कृती समिती येथून करण्यात आली शिबिराचे उद्घाटन राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले .
यावेळी सर्वांचे स्वागत राजवर्धन बिरंजे यांनी केले विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारचे शैक्षणिक दाखले शिबिर यापुढे कोल्हापुरातील प्रत्येक तालुक्यामध्ये मराठा ऑर्गनायझेशन यांच्या वतीने घेण्यात येणार आहे तरी विद्यार्थी मित्र व पालक यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ऋतुराज माने यांनी केले .
सायबर चौक येथील कॅम्प 29 जून पर्यंत चालू असणार आहे असे मंदार पाटील यांनी सांगितले .
यावेळी बिना देशमुख, प्रिया मिंचे , ऋतुजा देसाई, डॉ प्रविण कोडोलीकर, अभिजीत राऊत, कैदार माने, प्रसाद साळोखे, समर्थ शिंगारे, श्लोक चिंचवाडे, हर्षवर्धन पाटील, साईल ओसवाल, धनराज माने, यश कांबळे, संकेत माने, अनिकेत नरके, पार्थ पाटील, विश्वंभर पडवळ सिध्दांत गुडाळे आदी उपस्थित होते .

