shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रीन एन क्लीन शिरडीची सामाजिक जाणिवेतून मदत सदस्यांनी उभी केली ५१ हजारांची मदत..!



शिर्डी प्रतिनिधी ( संजय महाजन ) :
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात भयंकर लाटेतून जात असतांना म्युकरमायकोसिस या आजाराने पीडित असलेल्या शिर्डीच्या कटके कुटुंबियांना शिर्डी येथे ग्रीन एन क्लीन शिरडीच्या वतीने ५१ हजाराचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी अमोल कटके व त्यांच्या स्नुषा पौर्णिमा कटके यांना हा धनादेश देतांना अध्यक्ष अजित पारख, डॉ. जितेंद्र शेळके, मणीलाल पटेल, प्रदीप बाफना, किशोर बोरावके, दिलीप जगताप, नितीन शिंदे, आदींसह सदस्य उपस्थित होते. 

ग्रीन एन क्लीन शिरडीचे सदस्य अमोल कटके यांच्या आई गुणमाला कटके ह्या म्युकरमायकोसिस या आजाराने त्रस्त झाल्या होत्या. त्यावेळी शिर्डीसह राज्यात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. त्यामुळे एकत्र येणे शक्य नव्हते. त्यावेळी ऑनलाइन बैठक ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. त्यांना मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता होती. 

मुळात कटके यांची परिस्थिती बेताची असल्याने सर्व सदस्यांनी यथाशक्ती ज्यांना जसे शक्य होईल तशी मदत जाहीर केली. या कुटूंबाला एक मोठा हातभार लावला या उदात्त धोरणातुन ५१ हजार रुपये जमा झाले. अशी मदत सामाजिक जाणिवेतून ग्रीन एन क्लीन शिर्डीने उभी केली.
close