shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मस्साजोग येथे मा. दिपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरं गरिब‌ व गरजू व्यक्तींना विविध प्रकारच्या टॅबलेट वाटप..!!


*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे मुंबई प्रदेश प्रभारी महावीर डी सोनवणे यांचा अनोखा उपक्रम.

प्रतिनिधी । मस्साजोग :
केज तालुक्यातील मस्साजोग येथे दिनांक २७ जुन रोजी मा.दिपकभाऊ निकाळजे साहेब यांच्या वाढदिवस आहे त्या निमित्त दिनांक ३ जुन रोजी  मुंबई महानगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण सेवा संस्थेच्या वतीने व मस्साजोगचे रहिवासी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे मुंबई प्रदेश प्रभारी यांच्याकडून गावातील गोरं गरिब व  गरजू व्यक्तींना विविध प्रकारच्या टॅबलेट वाटप करण्यात आले.

अधिक माहिती अशी की   मस्साजोग येथील गोरं गरिब व गरजू व्यक्तींना कोरोनाच्या संकटामुळे बीड जिल्हा कडकडीत बंद असल्यामुळे नागरिकांना स्वतः ची पोटाची खळगी भरण्यासाठी हाती काम नसल्यामुळे व काही नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार  असल्यामुळे त्यांना त्या आजारांवर मात करण्यासाठी टॅबलेट सुरू आहेत व कोरोना महामारी च्या काळात नागरिकांचे  हाताचे काम बंद असल्यामुळे गरिब नागरिकांच्या खिशात टॅबलेट आणण्यासाठी पैसे नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे माहीत होताच मा. दिपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई महानगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण सेवा संस्थेच्या वतीने व मस्साजोग येथील रहिवासी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे मुंबई प्रदेश प्रभारी महावीर डी सोनवणे यांनी ज्या गोरं गरिब व गरजू व्यक्तींना सर्व प्रकारच्या टॅबलेटची आवश्यकता आहे अशा सर्व व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट देऊन मस्साजोग येथे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे या अनोखा उपक्रम राबविल्या बद्दल मस्साजोग नागरिकांना कडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे मुंबई प्रदेश प्रभारी महावीर डी सोनवणे यांचे कौतुक केले जात आहे यावेळी उपस्थित योद्धा फौंडेशन चे मुंबई अध्यक्ष तुषार जी सोनोने,पत्रकार अनंत जाधव , सरपंच संतोष अण्णा देशमुख,बिट अंमलदार धम्मपाल लोखंडे , दिनकर पुरी, सुभाष सोनवणे, जालिंदर सोनवणे, आबासाहेब नागिशे, अमोल बनसोड , किरण सोनवणे, नवनाथ सोनवणे, विजय सोनवणे, इत्यादी उपस्थित होते.
close