shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संयम आणि समृद्धी ..!!

संयम आणि समृद्धी 


संयम आणि समृद्धी 
जीवनाचे आहे डोळे 
संयमाचे मोठे बळ 
लागे समृद्धी डोहाळे 
    मन आहे साक्षीदार 
  व्हावे काळाच्या अधीन
   हात आणि पाय धड 
   आहे श्रमाचे जीवन 
जन्म -जीवन -मरण 
सत्य जीवनाचे सार
किती आले किती गेले 
कोठे उरे अधिकार 
   संयमाचे खरे फळ 
   लागे उशिरा झाडाला 
   समृद्धीचे मिळे पीक 
   येई शेतशिवाराला 
डोंगराची ही चढण 
येई कळस हाताला 
मग उताराचा वेग 
मिळे गतीच्या पायाला 
   शांत,संयमीपणाची 
 . महावीर सांगे खूण  
   बुद्ध म्हणे जीवनाला 
    अतदीपभव म्हण 
श्रद्धा आणि सबुरीचा 
हाच मंत्र विश्वासाचा 
पेरावे हाती चांगले 
 धर मार्ग मानव्याचा 
    संयम आणि समृद्धी 
    मान जीवनाचे धन 
    समाधान जगण्याला 
    एव्हढेच अवधान 
=डॉ. बाबुराव उपाध्ये, 11जून 2021
close