shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर तालुक्यामध्ये पुन्हा निर्बंध लागू...! जाणून घ्या निर्बंध...!!



संगमनेर । प्रतिनिधी( ऋषिकेश जगताप):
संगमनेर तालुक्यात रुग्ण संख्या कमी होत असली तरी नगर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या संगमनेर तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव वाढू नये यासाठी स्थानिक प्रशासन व व्यापारी असोसिएशन यांचे संयुक्त बैठकीत निर्बंध बाबत निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.   

संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व व्यावसायिक, दुकानदार यांना कळविण्यात येते की, स्थानिक प्रशासन व व्यापारी असोसिएशन यांचे संयुक्त बैठकीतील निर्णयानुसार  संगमनेर तालुक्यातील सर्व आस्थापना, दुकाने, कार्यालये सकाळी सात वाजेपासून ते सायं. ५ वा पर्यंत सुरू राहतील. सायंकाळी पाच वाजेनंतर फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत, इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्बंध दिनांक १० जून पासून लागू होणार आहेत,

सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व  सुरु राहतील.
सायंकाळी ५ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व  बंद राहतील.
close