shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माझी वसुंधरा अभियानांतर्गत एरंडोल नगरपालिकेला राज्यात २३वा क्रमांक व जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान..!!



प्रमोद चौधरी । जळगाव जिल्हा प्रतिनिधी:

एरंडोल महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात एरंडोल नगरपालिकेने जिल्ह्यात दुसर्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.महाराष्ट्र शासन,पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाद्वारे माझी वसुंधरा अभियानांतर्गत उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल मुख्यमंञ्यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनी दूरचिञवाणी परीषदेद्वारे संपन्न झालेल्या समारंभात विविध गटात जिल्ह्याला पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या अभियानात नगराध्यक्ष रमेश परदेशी,नगरसेविका-नगरसेवक यांचे अनमोल सहकार्य लाभले.

सदर अभियानात मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी,बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे,प्रियंका जैन, विकास पंचबुद्धे,अनिल महाजन, विवेक कोळी यांनी परिश्रम घेतले.
close