क्षीरसागर यांचा पदभार न देण्याचा निर्णय..!!
प्रतिनिधी : आसावरी वायकर
करमाळा (दि .२९) : सचिव पदाचा चेंडू आता पणन संचालकांकडे गेला असून सचिव पदाचा पेच कायमच राहिला आहे . यात ठराव मात्र पाटणेंचा पण डीडीआर यांचे मत कायद्यातील तरतुदीनुसार सेवाजेष्ठता व पात्रतेला पूरक असे आहे .क्षीरसागर यांनी पदभार न देण्याचा निर्णय घेतला असून १० पैकी ९ कर्मचारी ठाम आहेत .बाजार समिती सचिव पदासाठी समसमान ८ - ८ मते पडली . सभापती यांनी कास्टींग वोटचा वापर करून पाटणे यांचा ठराव केला .
बैठकीत जिल्हा उपनिबंधक यांनी पणन कायद्यातील तरतुदी, सेवानियम, सेवाजेष्ठता सविस्तर सांगून प्रोसेंडींगला लेखी मत नोंदविले .
यावर सेवाजेष्ठतेने पदभार स्विकारलेले क्षीरसागर यांनी मी पणन संचालक यांचेकडे दाखल केलेले अपील प्रलंबीत असून सदरची बाब न्याय प्रविष्ठ आहे व आजचा संचालक मंडळाचा काठावरील ठराव हा बेकायदेशीर असून महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनीयमन ) १९६३, नियम १९६७, मंजूर उपविधी व कर्मचारी सेवा नियमांचा भंग करणारे असल्याने अपिलात जाणार व चार्ज देणार नसल्याचे क्षीरसागर यांनी सांगीतले .
ठरावाच्या बाजूने बागल, चिं जगताप, ढेरे, रोडगे, केकान, बंडगर, शिंदे, झाकणे तर ठरावाच्या विरोधात जयवंतराव जगताप, सरडे, पाटील, रणसिंग, लबडे, गुगळे, दोशी, मोरे यांनी मतदान केले . क्षीरसागर यांनाच कायद्याने न्याय मिळेपर्यंत सर्वच कर्मचारी एकसंधपणे नियमाने लढा देणार असल्याचे ढाणे यांनी सांगीतले .
पूर्वीचे न्यायप्रविष्ट अपील व या ठरावाच्या विरोधात रितसर अपील दाखल करून न्यायनिर्णय होईपर्यंत चार्ज देता येणार नसल्याचे क्षीरसागर यांनी सांगीतले . जगताप गट सर्व कर्मचार्यांच्या तर बागल गट पाटणेच्या पाठीशी असल्याचे दिसले .

