प्रतिनिधी : अन्सार शेख
टाकळी काझी (दि .२९) नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील शासकीय रूग्णालयात नगर तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अशोक कोकाटे यांनी निवेदन देऊन सुमारे पाच दिवसापासून बंद असलेल्या १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण तातडीने सुरू करावेत अशी मागणी केली आहे.
त्याचबरोबर नगर तालुक्यातील अनेक लसीकरण केंद्रावर वाद-विवाद होण्याचे प्रकार नेहमी सुरू असतात मात्र चिचोंडी पाटील येथील सुज्ञ नागरिकांनी आत्तापर्यंत कोणतीही तक्रार न करत प्रशासनास सहकार्य केले आहे तालुक्यातील इतर लसीकरण केंद्रावर होणारे प्रकार चिचोंडी पाटील येथे घडू नयेत म्हणून प्रशासनाकडून दररोज 500 लसीकरण करण्यात यावे त्याचबरोबर चिचोंडी पाटील गाव गावातील लोकांना लसीकरण करावे,
सध्यास्थितीत चिचोंडी पाटील गावची लोकसंख्या दहा हजाराच्या आसपास असून येथील दहा टक्केही नागरिकांचे लसीकरण झालेले नाही ही बाब गंभीर असून याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय निकम यांच्याकडे सदर निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महादजी कोकाटे, सचिव संतोष वाडेकर, प्रशांत कांबळे, शहाजी गोरे, सुखदेव कोकाटे, बंडू खराडे, अंबादास कोकाटे, सतीश कोकाटे, जयसिंग दळवी, भरत कोकाटे, अक्षय कोकाटे, लिंबराज कोकाटे, सुरेश काळे, ग्रामीण रुग्णालय व्यवस्थापक सचिन तोडमल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .

