shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज शिव छत्रपतींचा राज्याभिषेक दिन ...शिवराज्याभिषेक दिनाच्या अनंत कोटी शुभेच्छा ...!

प्रतिनिधी । आसावरी वायकर :
फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर अखंड भारत देशासाठी सुद्धा महत्त्वाचा असा दिवस म्हणजे सहा जून. आजही आम्ही शिवरायांना 'द बेस्ट गुरु ऑफ मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेशन अँड ऑर्गनायझेशनअल स्कील साठी मानतो. 

क्षणाक्षणाला आठवतो .ज्यांच्यासाठी यशवंत,  कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, अशी आदरार्थी विशेषणे वापरतो यातच आमच्या राजाचे सामाजिक राजकीय व्यक्तिमत्व दिसून येते. 

शिवरायांमध्ये संघटक सेनापती द्रष्टेपणा इत्यादी प्रकारची दृष्टी होती. शिवराय आदर्श राजा होते. कल्याणकारी राज्याची संकल्पना राजे शिवराय यांच्याकडून जास्त शिकावी कसे वाटते.

त्या काळातही आजच्यासारखी संकटे आली. पण राजांनी सर्व प्रकारची संकटे परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळली. राज्याभिषेक का तर सर्व धर्मांना समान वागवणारा प्रजेला न्याय व सुख देणारा स्वराज्याचा कर्ता सर्वमान्य व्हावा म्हणून.
 
महाराजांचे गुणवैशिष्ट्ये आजच्या काळातही राज्य कारभारामध्ये आपण मार्गदर्शक म्हणून वापरत आहोतच. एक गोष्ट जरूर नमूद करावीशी वाटते ती म्हणजे महाराजांनी सर्वात पहिले महत्वाचे काम केले ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्व थरातील लोकांना संघटित केले. अशी एकजूट आपण करू शकतो. शिवरायांनी लोकांमध्ये ध्येयाची बिजे पेरली अशीच बीजे शालेय विद्यार्थ्यांमधून आपणही पेरू शकतो . 

श्रेष्ठ बनायचे असेल तर महत कृत्य व सत्कृत्य खूप महत्त्वाचे आहे. काम छोटे प्रचार बाजी, जाहिरात बाजी अधिक याच गर्तेत आज आम्ही रसातळाला जाऊ शकतो याचा विसर न होऊ द्यावा असे वाटते.
 

आजही शिवरायांविषयी अभिमानाचे शब्द येतात याचे मुख्य कारण राज्यकारभाराची त्यांनी बसवलेली व्यवस्थित घडी .

आजच्या पिढीला राजकारणात यायचं असेल तर त्यांनी शिवरायांच्या सर्व बहुआयामी व्यक्तिमत्वाचा अभ्यास करूनच समाजकारणात यावे असे वाटते .

अगदी शत्रूंना सुद्धा शिवरायांच्या प्रशासनाचा अभिमान होता हे कधीच विसरून चालणार नाही. शिवरायांचे राजकारण लोककल्याणकारी होते त्याच  प्रेरणेने आपणही लोककल्याणकारी व्हावे ही सर्व लोकप्रतिनिधींना हात जोडून कळकळीची विनंती .

आत्मकेंद्रित न होता समाज केंद्रित होऊयात.
तरुण पिढीसाठी शिवाजी महाराज  हे नाव न ठरता उर्जा ठरावी ज्याचा वापर विधायक कार्यासाठी समाज हितासाठी करण्यात यावा.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा म्हणतात ' जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास " सूर्य" संबोधले असते. आम्हाला जनतेला मात्र याचा विसर पडतो आहे. इंग्लंडचे लॉर्ड माऊंटबॅटन यांनी तर एक सूचक विधान केले होते.' जर शिवाजी महाराज इंग्लंड मध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते' .

आजच्या पुरता राज्याभिषेक दिन साजरा न करता वरील विधानांना अनुसरून उत्तम राज्य आदर्श राज्य कसे बनविता येईल यासाठी सर्वजण संघटित होऊयात आणि संपूर्ण महाराष्ट्र व देशाला वाचवूयात.

आज शिव छत्रपतींचा राज्याभिषेक दिन...!

शिवराज्याभिषेक दिनाच्या अनंत कोटी शुभेच्छा ...!

close