सर्व नागरिकांना
नम्र आवाहन ...
नम्र आवाहन ...
प्रतिनिधी । आसावरी वायकर
अ नगर (दि .६) : नगर शहरात सक्कर चौक ते स्टेट बँक चौक दरम्यान उड्डाण पुलाचे काम चालू आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने पावसाळ्यामुळे चिखल झाला आहे. कृपया कोणी या रस्त्याने जाताना कोणत्याही मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करू नका, गाडीचा वेग कमी ठेवा.
हे सांगायचे कारण की काल कोठी रोड वर अपघात झाला आणि एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे समजते....
या रस्त्याने जपून गाडी चालवा किंवा शक्य असल्यास हा रस्ता किमान दुचाकी साठी तरी टाळा. मोपेडची टायर लहान असल्यामुळे चिखलात घसरण्याचा धोका असतो. प्रत्येकाने काळजी घ्या
विशेष म्हणजे, या मृत व्यक्ति ने हेल्मेट घातलेले होते, त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, लहान मुलांना या ठिकाणी गाड्या देऊ नका, शक्यतो अंतर्गत रास्ते वापरा .. अजुन ६ महीने तरी फार काळजी घ्यावी लागेल.
असे शेख फारुख गुलाब ग्लोबल मानव पब्लिक सेवा समिति यांनी आवाहन केले आहे.

