shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

" हात फिरे तेथे..."

हात फिरे तेथे लक्ष्मी फिरे असे आपण नेहमी ऐकतो . एका मित्राच्या हॉटेलच्या उद्घाटनानिमित्ताने मी गेलो होतो. तेव्हा सहज विषय निघाला की एवढी मोठी हॉटेलची इमारत आता हिला दररोजचा देखभालीचा खर्च १०००/ रुपये आहे. मी मित्राला सहज विचारले, यातून तुला मासिक प्राप्ती किती होणार आहे.

त्यांनी सांगितले जर व्यवस्थित चालले तर मला सर्व खर्च वजा जाता दरमहा तीन लाख रुपये नफा होईल. चर्चेमध्ये हॉटेलच्या स्वच्छतेचा विषय निघाला तेव्हा मी त्याला म्हटले की स्वच्छतेवरती खर्च किती? तेव्हा त्याने दरमहा रुपये ३० हजारचे बजेट असल्याचे सांगितले. सहजच म्हंटले की तुला मासिक तीन लाख रुपये मिळण्यासाठी जी स्वच्छता करायला लागणार आहे त्यावर तू एवढे कमी बजेट का केलेस? तेव्हा तो म्हणाला हेच बजेट भरपूर आहे. 

मी त्याला उदाहरण दिले की हे बघ ! आपल्याला शिकवण आहे, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे'! म्हणजे आपल्या वास्तूमध्ये जेवढी स्वच्छता अधिक, नीटनेटकेपणा अधिक तेवढे तेथे समाधान जास्त राहते आणि तुझा व्यवसाय हा समाधान दिले तर पैसे देणारा आहे. आता ग्राहकांना जर समाधान मिळालं नाही तर ग्राहक तुझ्याकडे येणार नाहीत.  

तुझा अंदाज आहे त्या अपेक्षित उत्पन्नाच्या केवळ दहा टक्के तू स्वच्छतेवर खर्च करतो आहेस आणि इतर ज्यामुळे अस्वच्छता होईल अशा अन्य बाबीवर अती खर्च करतो आहेस. भविष्यात असेच होत राहिले तर तुझे गणित चुकेल. अस्वच्छता वाढेल. प्राधान्याने सफाई कामगारांना भरपूर पगार देणे केवळ परवडत नाही या सबबीखाली आपण सफाई करणे टाळतो किंवा साफ सफाई होत नाही. हे चुकीचे आहे. 

जर सफाई कामगारांना भरपूर वेतन दिले तर वास्तू सुखावते आणि आपला व्यवसाय देखील वाढीस लागतो. तर प्रथमत: सफाई कामगारांना समाधान होईल एवढे वेतन तू द्यायला सुरुवात कर. मित्राने माझा सल्ला ऐकला. संभाव्य उत्पन्नाच्या 20 टक्के बजेट म्हणजे साठ हजार रुपये दरमहा सफाई कामगारांवर खर्च करण्याचे ठरवले. यामुळे त्याच्या हॉटेलमधील संभाव्य कुबटपणा टळला. केवळ स्वच्छता, निटनेटकेपणा यामुळे  हॉटेलचा नावलौकिक वाढला आणि सहाजिकच  मासिक प्राप्ती अपेक्षित केली होती त्याहून कितीतरी अधिक उत्पन्न त्याला मिळू लागले.  हे केवळ एका स्वच्छतेच्या मानसिकतेमुळे झाले.
हात फिरे तेथे लक्ष्मी फिरे. 

लेखक : चंद्रकांत शहासने. पुणे.
मोबाईल : ९८८१३७३५८५.






.
close