इस्लामपूर (वार्ताहर ): एकच लक्ष कोटी कोटी वृक्ष हा नारा घेवून दिशा निसर्ग पर्यावरण व प्राणीसंवर्धन अभियानाच्या वतीने देशभर निसर्ग पर्यावरण पशुपक्षीसंवर्धन अभियान सुरु आहे.
याच अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिम्मित दिशा निसर्ग अभियानच्या वतीने इस्लामपूर येथे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.यावेळी अभिनाचे अध्यक्ष प्रा.विशाल जाधव, अभियानचे प्र.राज्य प्रमुख मा.कृष्णात कांबळे,सांगली जिल्हा प्रमुख मा.दादासाहेब सुतार,अभिजित सुर्वे,सागर पवार आदि उपस्थित होते.
याचबरोबर अभियानचे जालना जिल्हा प्रमुख प्रा.राजेंद्र काळे यांनी सहकाऱ्यासमवेत वृक्षारोपण केले.तसेच बुलढाणा जिल्हा प्रमुख मा.दीपककुमार सरदार यांनी सहकाऱ्यासमवेत वृक्षारोपण केले.वसमत तालुका प्रमुख विकास नरवाडे यांनी वृक्षारोपण करून संवर्धन केले.अभिनाचे राज्य संयोजक मा.विजय सनदी यांनी इचलकरंजी येथे झाडांचे रोपण केले.अभियानाचे राज्य सल्लागार डॉ.शरदचंद्र दिवान यांनी वृक्ष रोपण करून जागतिक वनीकरणाचा सल्ला दिला.पुणे जिला प्रमुख अनिल आगवणे व अमोल आगवणे तसेच अभिजित सातवेकर,करवीर तालुका प्रमुख मा.जगदीश पाटील यांनी वृक्षरोपण करून निसर्ग वाढीस चालना दिली.
देगलूर तालुका प्रमुख धम्मानंद कांबळे,जामनेर तालुका संयोजक ज्ञानेश्वर चांदणे यांनीदेखील वृक्ष लागवड केली.जत तालुका प्रमुख मा.दत्तात्रय मुंजे,सांगली जिल्हा उपविभाग महिला पदाधिकारी मा.भाग्यशाली खरात यांनीही झाडांची लागवड केली.तसेच इचलकरंजी शाखाच्या वतीने प्रमुख मा.अशोक ठोमके,मा.संजीवनी हरीअर,वंदना भंडारे,सरिता पांडव,गीता भागवत,शिवकुमार मुरतले,यांनी उत्साहात वृक्ष लावून दिन साजरा केला.
ठाणे जिल्हा उपप्रमुख मा.नरेंद्र अमृतकर,कागल तालुका महिला प्रमुख मा.सविता पाटील आणि सांगली जिल्हा महिला संयोजक प्रा.अफसाना संदे यांनीही वृक्षारोपण केले.आष्टा शहर प्रमुख प्रदीप हासबे यांनी हि जंगली झाडांचे रोपण केले.तरी या देश हिताच्या हरितक्रांतीच्या दिशा निसर्ग पर्यावरण व पशुपक्षीसंवर्धन अभियानात नागरिकांनी मोठ्या संखेने सहभागी होऊन हरीतदेश करण्यास योगदान देण्याचे आव्हान संस्थेचे संस्थापक प्रा.विशाल जाधव यांनी केले आहे.

