शिरूर । कासार जि.बीड.:
महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेचे अध्यक्ष मा. श्री.मधुकरराव मैड यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांसह शिरूर कासार येथील कै.विशाल सुभाष कुलथे यांच्या कुटुंबीयांच्या घरी जावून नुकतीच भेट घेतली व सांत्वन केले.
संघटनेचे प्रमुख सुत्रधार मा.श्री. गोविंद दादा अंबिलवादे, राज्य महिला अध्यक्षा सुरेखा ताई लोलगे व युवती प्रदेशाध्यक्षा सारीकाताई नागरे यांनीही दृकश्राव्य माध्यमातून कुलथे कुटुबीयांशी संवाद साधत कटुंबाप्रती आपल्या भावना व संवेदना प्रकट केल्या. संघटना सदैव आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली.घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करुन सदरील खटला शीघ्रगती न्यायालयात चालवून गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी या साठी संघटना सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
सोबत राज्य प्रसिद्धी प्रमुख मा.सुनील बोऱ्हाडे, बीड जिल्हा अध्यक्ष मा.सुधाकर बेद्रे,जालना जिल्हाध्यक्ष मा.श्री.सत्यनारायण उदावंत,अंबड तालुका अध्यक्ष मा.विष्णु बोंदरे, पाथर्डी तालुका अध्यक्ष विष्णूपंत चिंतामणी,नंदकुमार डाळींबकर ,सुरेश कुलथे,डीगंबर जोजारे , शिरूर कासार शहरातील शुभम कुलथे, मुरलीधर कुलथे ,प्रशांत कुलथे , दिलीप बेद्रे ,विकास कुलथे सर, व्यंगचित्रकार दीपक महाले सर आदि समाज बांधव व महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर मा.मधुकरराव मैड,संघटनेचे पदाधिकारी व उपस्थित समाज बांधव यांनी पोलिस स्टेशन शिरूर कासार येथे जाऊन पोलिस निरीक्षक,श्री.माने साहेब यांची भेट घेतली. कै. विशाल कुलथे खुन प्रकरणी सविस्तर चर्चा केली. आरोपींना अत्यंत शिताफीने व तातडीने अटक करून गुन्हा दाखल केल्याबद्दल पोलिस निरीक्षक मा.श्री.माने साहेब व त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार मानले व अभिनंदन केले.तपासकामी संपूर्ण सहकार्य राहिल असे पोलिस अधिकार्यांकडून सांगण्यात आले.

