shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाड येथील श्री शरद मुरलीधर गांगल वय ५९यांनी आज पर्यन्त वेगवेगळ्या रक्तपेढीत जाऊन "१३१" वेळा रक्तदान..!!

राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी :-
१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त........!
                ( हेमकांत सोनार)
                   अलिबाग-रायगड

आज १४ जून "जागतिक रक्तदाता दिन" (World Donar Day)म्हणून संपूर्ण जगभर "रक्तदाता" स्वैच्छिक रक्तदान मोहिमेव्दारे रक्तदान करून साजरा केला जातो.

आँस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डॉ.कार्ल लँडस्टेनर यांच्या जन्मदिनामित्ताने हा दिवस "जागतिक रक्तदाता दिन" म्हणून साजरा केला जातो.तसेच त्यांना "रक्तगटाचा जनक" म्हणून संबोधले जाते.ABO रक्तगट प्रणालीचा शोध लावणाऱ्या या अलौकिक शास्रज्ञांचा जन्म १४ जून १८६८साली आँस्ट्रेलियातील व्हिएन्ना या शहरात झाला.१९०१ साली त्यांनी A B O रक्तगटाचा शोध लावला. जी प्रणाली आज जगभर वापरली जाते.त्यांच्या या संशोधनासाठी१९३०मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे १४जून हा दिवस Save Blood Save Life या संकल्पनेतून साजरा करण्यात येतो.जागतिक आरोग्य संघटनेचे यावर्षीचे घोषवाक्य आहे "Give Blood and keep the World Beating".(रक्तदान करा व जगाचे स्पंदन कायम ठेवा.!)



" रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान" आहे हे आपल्या समाजात सर्वतोपरी समजले जाते. रक्तदान हे सर्व श्रेष्ठ जीवनदान आहे. आपल्या सारख्या सामान्य व्यक्ती ही रक्तदान करुन दुसऱ्याचा जी वाचवू शकते. रक्तदात्याचे आभार व्यक्त करण्यासाठी २००४ पासून जागतिक आरोग्य संघटना "१४ जून हा दिवस,'जागतिक रक्तदाता दिन" म्हणून साजरा करत असते.
     
(महाडचे श्री शरद मुरलीधर गांगल (रक्तदाता)यांचे १३१वेळा रक्तदान..)
    

आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त अनेकांनी १०,२०,५०,१०० वेळेस रक्तदान केले आहे.रायगड जिल्ह्यातील महाड येथील श्री शरद मुरलीधर गांगल (वय ५९)यांनी आजपावतो वेगवेगळ्या रक्तपेढीत जाऊन "१३१" वेळा रक्तदान करून नवा आदर्श घडविला आहे.१२५वे रक्तदान जिल्हा रुग्णालय अलिबाग-रायगड रक्तपेढीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड तर १३१ वे रक्तदान जनकल्याण रक्तपेढी महाड -रायगड येथे केले.शरद गांगल हे "रक्तदाता" म्हणून रायगड जिल्हासाठी अभिमानाची बाब आहे.याची सर्व नोंदी त्यांच्या जवळ असून महाराष्ट्रात असे रक्तदाते नगण्यच आहे .म्हणून आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त श्री शरद मुरलीधर गांगल नवीन रक्तदात्यांसाठी प्रेरणादायी आहे.
        
 स्वैच्छिक रक्तदानाविषयी :-
"रक्तदाता" हा रुग्णांचा महत्त्वाचा दुवा असल्याने स्वैच्छिक रक्तदात्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. 
"रक्‍त" हे शरीराचा अविभाज्‍य घटक असून संपूर्ण मासपेशींना तसेच अवयवांना पोषण व प्राणवायू (ऑक्‍सीजन) देण्‍याचे काम रक्‍त करत असते. गरजू रुग्‍णांसाठी रक्‍तदान केल्‍याने त्‍यांचे प्राण आपण वाचवू शकतो असा संदेश "स्वैच्छिक रक्तदाता" म्हणून समाजासाठी देऊ शकतो.

रक्तदान केल्यानंतर नवीन पेशी तयार होण्यास उत्तेजना मिळते.रक्तदान प्रक्रियेत रक्तदानाची सुरक्षितता काटेकोरपणे पाळली जाते. त्यामुळे कोणत्याही इजा किंवा आजार होण्याची शक्यता नसते.

आपल्या शरीरात अंदाजे ५ ते ६ लिटर रक्त असते त्यातील फक्त३५०मि.लि.म्हणजे पाच टक्केच रक्त रक्तदानाव्दारे घेतले जाते.
*रक्तदानापुर्वी रक्तदात्याचे वजन, वय, शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, रक्तदाब आदी तपासणी वैद्यकीय तज्ञांच्या व्दारे करुनच रक्तदानासाठी परवानगी दिली जाते.
*रक्तदानासाठी१० ते १५ मिनिटे लागतात मात्र आपल्या स्वैच्छिक रक्तदानाने एखाद्या रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.
*दान केलेल्या रक्ताची एचआयव्ही, कावीळ (बी आणि सी), गुप्तरोग, मलेरिया, इ.तपासणी करून रुग्णांना दिले जाते.
*“ रक्तदानाने लालपेशी,पांढऱ्या पेशी रक्तबिंबिका इ. काँम्पोंनंट सप्रेशन व्दारे वेगवेगळ्या करून गरजू रुग्णांना वेळप्रसंगी दिल्या जातात याचा रुग्णांना फायदा होतो.
     
माझे "स्वैच्छिक रक्तदान" का महत्त्वाचे :-

◆थँलेसेमिया,हिमोफिलिया,प्रसुती ,अपघात,रक्तक्षय, इ.रुग्णांसाठी रक्त हे "लाईफ लाईन" आहे अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज असते अशा रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी माझे रक्तदान अमुल्य आहे.
◆बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.
◆रक्तदान प्रक्रियेत रक्तदानाची सुरक्षितता काटेकोरपणे पाळली जाते. त्यामुळे कोणत्याही इजा किंवा आजार होण्याची शक्यता नसते.
◆मानवी रक्ताला पर्याय नाही कारण "रक्त" हे कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत तसेच कारखान्यात तयार करता येत नाही तसेच जास्त दिवस साठवूनही ठेवता येत नाही. त्यामुळे माणसाचा जीव वाचविण्यासाठी मानसाचेच रक्त द्यावे लागते. यासाठी माझे स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे.
◆रक्तदान हे जीवनदान आहे म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.यासाठी माझे रक्तदान महत्त्वाचे.
◆दान केलेले रक्त चोवीस तास ते सात दिवसात नैसर्गिकरित्या भरून निघते.
◆माझ्या स्वैच्छिक रक्तदानाने एखाद्या रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.यासाठी माझे स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे.
◆माझे रक्तदान सुरक्षित,आनंददायी तसेच वेदनारहित असते. यासाठी महत्त्वाचे.
◆समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून निस्वार्थपणे,समाजहितासाठी, राष्ट्रसेवेच्या भावनेतून आपले रक्तदान महत्त्वाचे.
 
कोरोना काळात रक्तदात्यांमध्ये भितीचे वातावरण आणि लाँकडावून:-
     
सध्या देशात कोविड-१९कोरोना विषाणूची साथ आहे. यामुळे सर्वत्र लाँकडावून असल्याने, कंपन्या महाविद्यालय तसेच विविध संस्था, कार्यालय बंद असून रक्तदानाविषयी रक्तदात्यांमध्ये भिती अथवा संभ्रम निर्माण झाला. रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ लागला.गरजू रुग्णांना यामध्ये थँलसेमिया,सिकलसेल, हिमोफिलिया, प्रसुती, अपघात आदी रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासू लागली. यासाठी रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचना यामध्ये सोशल डिस्टंसिंग,मास्क्, सँनिटायझर इ.सुचनांचे पालन करून रक्तदानशिबीर आयोजित केल्यास अथवा रक्तसंक्रमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही असे तज्ञांच्या मतानुसार शासनस्तरावरून सांगण्यात आले. शासनाकडून मा.मुख्यमंत्री साहेब, मा.आरोग्य मंत्री साहेब ,राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद ,राष्ट्रीय एड्स नियंत्रण,तसेच मा.जिल्हाधिकारी, राज्य रक्त संक्रमण परिषद,तसेच रक्तपेढी प्रमुख इ.यांच्या मार्फत स्वैच्छिक रक्तदानासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात येते.
    
मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्याने रक्तदानाची प्रेरणा समाजात दृढ करणे, सुदृढ रक्तदात्यांची फौज उभी करणे, वाढदिवसाला किंवा तीन महिन्यांनी रक्तदान करणे , रक्तदानाची प्रेरणा रक्तदात्यांमध्ये  दिर्घकाळ टिकून रहाणे यासाठी रक्तदान यज्ञात स्वेच्छा रक्तदाता म्हणून सहभागी व्हावे .समाजाचे जबाबदार घटक या नात्याने समाजात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी एवढाच उद्देश.
close