shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रभाग क्र .२ निर्मलनगर गाडेकर चौक येथील रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार..!!

नगरसेवकांनी स्थानिक नागरिकांशी केली चर्चा ..


प्रतिनिधी :संजय वायकर

अ नगर : ( दि .१३ ) : नगर येथील सावेडी उपनगरात असणाऱ्या निर्मलनगर भागातील मूळे एसटीडी चौक ते तपोवन रस्त्याचे काम लवकरच सुरु करणार असल्याचे प्रभाग क्र .२ चे नगरसेवक श्री . निखिल वारे  यांनी सांगितले .




प्रभाग क्र .२ मधील नगरसेवक आणि स्थानिक नागरिक यांची नुकतीच रस्ता डांबरीकरण करण्या विषयी चर्चा झाली . रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी आणि इतर समस्या याची माहिती लोकप्रतिनिधींकडून यावेळी घेण्यात आली.

प्रभागातील हा रस्ता अत्यंत रहदारीचा असून रस्त्याचा दर्जा उत्तम चांगला उच्च प्रतिचा रहायला पाहिजे याची काळजी अहमदनगर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सक्त सुचना करण्यात आल्याचे निखिल वारे यांनी सांगितले .

महाराष्ट्र शासनाच्या निधिमधून या रस्त्याचे काम प्रभागातील चारही नगरसेवकांच्या वतीने करण्यात येणार असून रस्त्याचे काम अतिशय चांगल्या दर्जाचे करू असे नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुधे , सुनिल त्र्यंबके यांच्याकडून सांगण्यात आले.

यावेळी भाऊसाहेब मोरे, चंद्रकांत वायकर, प्रशांत सदावर्ते , पार्श्वनाथ औटी , सुधीर खामकर, पप्पू मोरे , संभाजी गवळी ,सोनू खामकर सागर गवळी , संतोष भराट गांधले काका , डॉ. ताजवे , ज्ञानदेव काळे ,गणेश मंगुडकर , सुरेश रोकडे आदि उपस्थित होते .

close