महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी ..
प्रतिनिधी :संतोष वायकर
करमाळा :(दि .१३) : वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त बुधभूषण फाउंडेशन करमाळा यांच्या वतीने N 95 मास्क चे वाटप हनुमान परदेशी, अक्षय परदेशी विश्वजीत परदेशी ,अमोल परदेशी, तुकाराम गुजर यांच्या हस्ते करण्यात आले, सकल क्षत्रिय राजपूत समाज करमाळा यांच्यासह फाऊंडेशनचे व्हाईस चेअरमन दुर्गेश राठोड यांची विशेष उपस्थिती होती .
महाराणा प्रताप यांचा इतिहास संपूर्ण जगाला आणि समाजाला प्रेरणा देणारा असल्याचे दुर्गेश राठोड यांनी यावेळी सांगितले .
फाऊंडेशनचे सदस्य सुशिल कात्रेला यांनी N 95 मास्क उपलब्ध करून दिले .यावेळी बुधभूषण फाउंडेशन चे चेअरमन अमोल दुरंदे, सचिव रुपेश लाटे , संस्थेचे विश्वस्थ विशाल जकातदार, वैभव शिंदे, अनिल गोडगे ,लालासाहेब खेडकर, सुखदेव शिंदे ,विकास राठोड , ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते . सुधाकर खळदकर यांनी आभार मानले .



