प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
जोरदार वाऱ्यासह आणि विजांच्या गडगडाटासह मृग नक्षत्राची एंट्री;बीड जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे.
गेल्या अनेक दिवसापासुन मृग नक्षत्र निघाले असताना मृगाचा पाऊस पडत नसल्याने शेतीचे कामे आटोपून केज तालुक्यातील बळीराजा पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात होता.
तो दिवस अखेर आला आणि काल दुपार नंतर अचानक जोरदार वाऱ्यासह व विजांच्या गडगडाटासह अति मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुनपुर्वीच पेरणी अगोदरच्या मशागतीची कामे आटोपून खत बियाणे नेहुन पेरणीसाठी मृगच्या पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात होते. त्यातच काल दि.१२ जुन रोजी दुपारपर्यंत कडक ऊन होते. मात्र दुपारच्या नंतर आकाशात अचानक काळेभोर ढग जमा झाले. आणि दुपारी ४ च्या सुमारास जोरदार सोसाट्याचा वारा सुरू झाला. आणि पहातापहाता विजांच्या कडकडाटसह सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत जोरदार ते अति जोरदार पाऊस झाला. यावेळी अनेक ठिकाणी रस्त्यावर व शेतात मोठमोठी झाडे ऊन्मलुन पडली. तर पडलेल्या या पावसाने नद्यानाल्यांना पुर आले.
अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात कामाला गेलेल्या लोकांची त्रिधा ऊडाली.कित्येक जण मिळेल त्या ठिकाणी निवाऱ्याला बसले परंतु यापावसाचे आक्राळ विक्राळ रुप अनेक जणांच्या काळजात धडकी भरवणारे दृश्य डोळ्याने पहाण्यासारखे नव्हते. या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असुन नद्या नाल्यांना पुर आले आहेत. हा पाऊस रात्री उशीरा पर्यंत सुरु होता. या पावसामुळे त्रिधा त्रिधा ऊडाली असली तरी मात्र शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजही सकाळी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस चालुच राहिल असे वातावरण आहे. तर दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

