----------------------------------------
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील साळेगाव येथे रस्त्याच्या कामात अडथळा आणून गोंधळ घालीत काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अंमली पदार्थाच्या नशेत असलेल्या तरुणास गावकऱ्यांनी चांगलेच बदडून काढीत त्याला शिवभोजन दिले. याची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
केज तालुक्यातील साळेगाव येथे दि. २९ जून रोजी दुपारी महामार्गा लगतच्या रस्त्याचे काम मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्क्चर लिमिटेड कंपनी करीत आहे. मुख्य महामार्गा पासून अंदाजे ४०० फूट लांबीच्या सिमेंट रस्त्याचे काम सूरु असताना गावातील एक तरुण त्या ठिकाणी येऊन कामगार व इतरांना शिवीगाळ करून काम रोखण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला समजावूनही तो ऐकण्याच्याया मनःस्थितीत नव्हता. वारंवार तो आशा प्रकारे गैरवर्तन करीत होता. स्वतःचे शर्ट काढून ओरडत होता. म्हणून मग गावकऱ्यांनी त्याला चांगलाच बदडून काढले. मग मात्र तो गावकऱ्यांच्या हातचे 'शिवभोजन' खाल्ल्या नंतर निवांत झाला.
दरम्यान आशा प्रकारे विकास कामात अडथळा निर्माण करून विकासाच्या आड येणाऱ्यार कायदेशीर कार्यवाही होऊन त्यांचा बंदोबस्त व्हायला हवा अशी मागणी होत आहे.

