shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार सुप्रियाताई सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तालुक्याला मिळाले. म्हणून तालुक्याचा विकास होत आहे.. अतुल झगडे.

खासदार सुप्रियाताई सुळे आणि  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तालुक्याला मिळाले. म्हणून तालुक्याचा विकास होत आहे.. अतुल झगडे.
इंदापूर: चाकाटी येथे संसद महारत्न सुप्रियाताई सुळे यांच्या बावन्नाव्या वाढदिवस  विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अतुल झगडे म्हणाले की, खासदार सुप्रियाताई सुळे यांचे या भागाकडे नेहमी लक्ष असते. 
  लोकसभेतील प्रत्येक गावाला छोट्या-मोठ्या विकास कामे कशी पोचतील यासाठी आम्ही खासदार सुप्रियाताई यांच्या संपर्कामध्ये राहून कामाचा पाठपुरावा करीत असतो. ताईंचे नेहमी छोटे गाव असले तरी त्यांचे लक्ष असते. 
पुणे जिल्हा नियोजन मंडळ यांच्या माध्यमातून, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन यांच्या माध्यमातून तालुक्याचे मार्गदर्शक आमदार कार्यक्षम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आमदार फंडातून  विकास कामे ताईंच्या आणि राज्यमंत्री भरणे यांच्या माध्यमातून  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आणि कामे मोठ्या प्रमाणात कशी होतील या संदर्भात चाकाटी गावचे नवनाथ रुपनवर व सरपंच संजय रुपनवर नियमित पाठपुरावा करीत असतात
 म्हणून चाकाटी सारख्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी  राष्ट्रवादी पक्षाला यश मिळत आहे. 
गेल्या काही दिवसापासून पाच टीएमसी पाणी प्रश्न किंवा नदीच्या बंधाऱ्यातील बॅरिगेट उभा करण्याचे कामे असतील तर भरणे यांचे कशा पद्धतीने लक्ष असते हे आपल्याला अनेक वेळा मीडियाच्या माध्यमातून माहित होतं. 
आपण सर्व नशीबवान आहोत की आपल्याला आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळेआणि कार्यक्षम नेतृत्व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे तालुक्याला मिळाले. आणि आपल्या गावाचा, विभागाचा, तालुक्याचा विकास होत आहे .तो  अतिशय उल्लेखनीय होतआहे .याची महाराष्ट्र राज्यांमध्ये दखल घेतली जाते .
आपण अशा नेतृत्वाचे माध्यमातून उभा म्हणून आपणनेहमी क्रियाशील आणि कार्यक्षम राहत असतो. आणि आपल्या आजूबाजूच्या विकास होत आहे. म्हणूनच आज ताईंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला निश्चितपणे गौरवाची बाब आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने गावचे सरपंच संजय रुपनवर ग्रामस्थ व ग्रामसेवक यांचे आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो. असे मत त्यांनी व्यक्त केले.

चाकाटी येथे आरोग्य विभाग उपकेंद्र निर निमगाव व ग्रामपंचायत चाकाटी यांचे संयुक्त विद्यमानाने तसेच चाकाटी गावचे आदर्श सरपंच यांच्या संकल्पनेतून संसद महारत्न सुप्रियाताई सुळे खासदार बारामती लोकसभा मतदारसंघ यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त ५२ गोरगरीब महिलांना साडी वाटप ,२५० फळझाडांचे वृक्षारोपण व भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले असून यामध्ये बीपी, शुगर ,दमा ,हिमोग्लोबीन इत्यादी आजारावरील तपासण्या करून व कोविंड डोस दिले  .


 ग्रामपंचायत चाकाटी येथील पाच पांडव सभामंडप राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आमदार फंडातून मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक केशव (काका) मारकड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला .तसेच स्मशानभूमी सुशोभीकरण कॉंक्रिटीकरण याचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

 या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, , कार्याध्यक्ष अतुल झगडे,   ,तालुका उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ,माजी सरपंच केशव मारकड, डॉ. कपिल कुमार वाघमोरे, डॉ.विनोद घोगरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. ३० जून  २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता केक कापून वाढदिवस साजरा  करण्यात आला

   वाढदिवसा निमित्त  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   नागरिकांचा या कार्यक्रमास उस्फूर्तपणे सहभाग दिसून आला. 
.या कार्यक्रमास सरपंच संजय रुपनवर ,उपसरपंच शुभांगी तनपुरे ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब मारकड, समाधान घोडके, पारूबाई जाधव, मनीषा रुपनवर, हर्षाली मारकड, ग्रामसेवक एस एम गायकवाड, डॉ. मेघा सस्ते, डॉ. सुमित ढोले, आशा सीमा घोडके, विजय मारकड,  विलास भोसले, रामभाऊ कापसे, अतुल तनपुरे, आप्पा वरकड, साहेबराव लावंड व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
close