प्रचंड वापर होत असलेल्या मिडियाचा आज सोशल मिडिया दिन..!!
प्रतिनिधी : आसावरी वायकर
आज आहे 'सोशल मिडिया डे' जरा सगळ्यांच्या आवडीचा विषय ! लॉकडाऊन पासून तर या सोशल मीडियाने अगदी धुमाकूळ घातलाय. मार्गच नव्हता ना दुसरा. वृत्तपत्रे बंद, सिनेमागृहे बंद, हॉटेल नाहीत मग काय सगळ्यांनी म्हणजेच अख्या जगाने सोशल मीडिया हा एकमेव मार्ग निवडला.
कालच अहमदनगर मधून महापौर आणि उपमहापौर निवडीची घोषणा झाली. आधी नूतन महापौर साहेबा आणि उपमहापौर साहेब यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. सर्व अहमदनगरवासीयांकडून भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा आणि हो अपेक्षा पण हं!!
सोशल मीडिया म्हणजे काय त्याचे प्रकार वगैरेंवर मी अजिबात बोलणार नाही. पण खरोखरच आज गेल्या वर्षीपासून सोशल अकाऊंटवर वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे 70 टक्के वेळ हा सोशल मीडिया साठी दिला जातो त्यातही महिला वर्गाचे प्रमाण सोशल मीडिया वापरण्यावर अधिक आहे.
काय झालं ना आता सगळ्यांना सोशल मीडिया अधिक सोयीस्कर वाटू लागला आहे . अगदी बाळाच्या जन्मापासून ते एखाद्याची अंतयात्रा बिनधास्त सोशल केली जाते . पूर्वी गर्भारपण आणि बाळाचा जन्म, तसेच अपघात, खून हे अगदी गुपित असायचं कारणही होतं तसंच पण आज या सोशल मीडियाने सर्वांचे लाइफ पर्सनल वरून अगदी पब्लिक केले आहे.
सोशल मीडियाने रानु मंडल फेमस केली. मंजेश्वर ब्रदर ही छोटी मुले सातासमुद्रापार वरून दाखवली. गावरान चव आपल्या आजी ने दाखवली. तर कोल्हापुरी तिखटाचा झटका आमच्या सासू-सून यांनी गावरान एक खरी चव मधून सातासमुद्रापार ओळख करून दिली. खरंच खूप जवळ आलो ना आपण. पण कुटुंब व्यवस्था धोक्यात आली. नको त्या भानगडी जास्त वाढल्या टिक टॉक, मोज यासारख्यांनी प्रदर्शन करून अगदी शरम वाटेल असे व्हिडिओ प्रदर्शित केले आज काहीच लपून राहिले नाही याची आता खूप खंत वाटते .
मंडळींनो आपण ठरवूयात , फक्त चांगले चांगले आणि चांगलेच व्हिडिओ आपण आदानप्रदान करायचे. सोशल मीडिया साठी कायदे आहेत सुरक्षितता आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे .अहो मेसेज टाकायचा ना. थांबा जरा विचार करा मंगळवारी कधी गुड मॉर्निंग मंडे हा मेसेज येतो. चार वर्षापूर्वी चा जुना व्हिडिओ परत-परत व्हायरल होतो. तोसुद्धा पुरावा नसलेला. नका ना असे करून एकमेकांची दिशाभूल करू. अरे थोडसा बदलूयात ना!! मंडळींनो, मुलांकडून काही कलाकृती तयार करून घ्या पाठवा मीडियावर. भाषण सादरीकरण खरंच छान वाटत. दोन वर्षापासून आपण शालेय स्नेहसंमेलन यापासून दूर आहोत.
मुलांनो, पाठवा स्नेहसंमेलना सारखे तुमचे सादरीकरण तुमच्या शाळेला. बघा कसे छान वाटेल मित्रांनो सोशल मीडिया हा जसा चांगला प्रमोशन पार्ट आहे तितकाच घातक पण आहे बरं का!! अनावश्यक संपर्क कधीतरी घातकही ठरू शकतो ते विसरून चालणार नाही. विधायक पद्धतीने विचार करायला काय हरकत आहे बघा बरं नक्की जमेल!!
अनुरिता झगडे
रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल

