shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माकडाच्या हाती कोलीत..!!

*केजच्या उपजिल्हा रुग्णालयात चालतो कोव्हीड तपासणीचा सावळा गोंधळ..!! 

*तंत्रज्ञ घरी अन तपासणी करतोय रूग्णवाहिकेचा ड्रायव्हर ! 

*तपासणी न करताच कोव्हीड तपासणीचे प्रमाण-पत्र ही दिले जात असल्याची चर्चा !

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
केज येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड तपासणी केंद्रातील गोरखधंदा एका फोटोमुळे उघड झाला आहे .  या फोटोत रुग्णाची आर टी पी सी आर टेस्ट हा तपासणी केंद्रातील तंत्रज्ञा ऐवजी चक्क एका खाजगी रूग्णवाहिकेचा चालक एका संशयित रुग्णाची तपासणी करीत असताना दिसत आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज येथे उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड तपासणी केंद्रात चक्क तंत्रज्ञा ऐवजी अन्य एकजण म्हणचे एका खाजगी रुग्ण वाहिकेचा ड्रायव्हर एका रुग्णाची आर टी पी सी आर तपासणी करण्यासाठी स्वॅब घेत असल्याचे फोटोत दिसत आहे. हा अत्यंत निष्काळजीपणा व रुग्ण आणि त्यांच्या जिविताशी खेळण्याचा प्रकार आहे. 

या तपासणी केंद्रातील कोव्हीड तपासणी करणारा कंत्राटी तंत्रज्ञ हा काम करीत नसून तो आशा प्रकारे  बिगर तांत्रिक व खाजगी व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे काम करून घेत असल्याची माहिती मिळत आहे. 

व्हायरल झालेल्या फोटो हा सहा दिवसा पूर्वीचा असून  त्या कोव्हिड तपासणी करतानाचा आहे. तसेच येथे कोणतीही तपासणी न करताच प्रमाण-पत्रे देखील दिले जात असल्याची लोकांत चर्चा सुरू आहे. अशा या प्रकारामुळे लोकांचा तपासणीवरील विश्वास कमी होत असून त्यामुळे पुन्हा कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.                  

 सदर कामचुकार कर्मचाऱ्याचे नाव शिवराज मुथळे असल्याची माहिती भेटत आहे .

--------------------------------------------------


या प्रकरणी अधिक चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल.

-----  डॉ संजय राऊत

  वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, केज

--------------------------------------------------


"तपासणी केंद्रात दोन तंत्रज्ञा असून हा प्रकार जर खरा असेल त्याची अधिक माहिती घेऊ व पुढील कार्यवाही केली जाईल."

       ---  डॉ आसाराम चौरे,

नोडल अधिकारी, कोरोना केअर सेंटर

---------------------------------------------
" मला लक्षणे जाणवू लागल्याने दि.२३ जून रोजी सकाळी तपासणी करण्यासाठी केज येथील कोव्हीड तपासणी केंद्रावर गेलो असता तेथील कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी न घेता किंवा पीपीई किट किंवा ग्लोज घातलेले नव्हते. हे मी त्यांच्या निदर्शनास आणले असता त्यांनी दुर्लक्ष केले. "

                --- प्रितम जोगदंड, केज

------------------------------------------------

" मी जेवण्यासाठी घरी गेलो असताना ही तपासणी झाली असावी. मी ऑन कॉल पद्धतीने कंत्राटी पद्दीवर काम करीत असून नाहक मला बदनाम करण्यासाठी असे प्रकार घडविले जात आहेत.

                 --- मूथळे, 

     कंत्राटी प्रयोग्यशाळा तंत्रज्ञ
close