प्रवास ग्रामीण भागातील तरूणांने ग्रामीण नवं-कलाकारांना मुंबईत जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा..
10 जून अर्थात आपल्या कला-समृद्धी परिवाराचा #वर्धापन_दिन मागील एक दीड वर्षांपासून आपण सर्व जण कोरोना सारख्या महाभयंकर राक्षसाशी सामना करतोय. त्या मुळे काही करता नाही आलं पण येणाऱ्या काळात कलाकारांसाठी अनेक चांगले उपक्रम राबवून अनेक कलाकार घडविण्यासाठी मी आणि माझी टीम कटिबद्ध आहोत..आपली सर्वांच्या प्रेमाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत..
#कला_समृद्धी
वेळ लागेल वाचायला पण सुरवात केली की शेवट केल्या बिगर थांबणार नाही हे मात्र नक्की..
कथेला सुरवात होते खरंतर खुप दिवसा अगोदर, 2018 ला आपल्या बात्तकु ची निर्मिती होते.. पुरस्कारावर पुरस्कार मिळत जातात... आता बातकू फक्त एक टीम नाही तर एक परिवार झाला होता, आनि मी त्या परिवाराचा मुख्य,,
माझ्या पेक्ष्या कदाचित काही मोठे काही लहान असतील ही, पण नेहमी सर्वांनी घरच्या वडीलधाऱ्या माणसांना जसा सन्मान द्यावा तसा सन्मान देत होते,, एव्हाना सर्वांच्या घरच्यांनी सुद्धा या परिवाराला संमती दिली होती, कुठे ही निघाले तरी घरचे सर्व परिस्थिती वर मात करून हसत हसत संमती देत होते ( काही जण माझ्या सोबत आहेत म्हणून बाहेर प्यायला जातात तो भाग वेगळा😊😊🙏🏻🙏🏻)
सर्वांनी सर्वांची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा पाण्यासारखा पैसा ओतला होता,
सर्वजण भेटत होतो पुरस्कार वर पुरस्कार घेत होतो, पैसा मात्र जातच होता, सर्वांसोबत मी पण नेहमी हसत होतो पुरस्कार घेत होतो,
पण आता मला पुरस्कारांमध्ये रस नव्हता,, एक कुटुंबाचा प्रमुख या नात्याने मन अस्वस्थ होत होतं,, काहीतरी मोठं कारायचा डोक्यात योजना करत होतो, डोक्यात आता पर्यंत बऱ्या पैकी काहीतरी तयार होतं, मी माझ्या संपूर्ण कुटूंबाला नक्कीच भरपूर देऊ शकतो याची तर खात्री आधी पासूनच आहे,, पण आता मला त्यासाठी मजबूत पाया बनवायचा होता,, मी त्या नुसार काम तर चालू केलं होतंच,, एक आगळा वेगळा महोत्सव करायचा होता, हे मनाशी ठरवलं होतं, पण अजून कुणाला काही सांगितलं नव्हतं,, आतापर्यन्त आपल्या सर्व टीम ने भरपूर महोत्सव बघितले होत, अंदाज आला तर होताच,
माझा पण यावरचा अभ्यास करून झाला होता,
आता एक शेवटचा महोत्सव बघायचा होता, आणि मग काय मी आणि सुरज ने ग्वालिअर ला जाण्याच ठरवलं,, जाऊन पोहचलो ग्वालिअर ला..
तिकडे ही आपल्या बात्तकु ला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून गौरविण्यात आलं. परतीचा प्रवास सुरु झाला होता, आधीच्या रात्री मी आणि सुरज ला मी बऱ्यापैकी सांगितलं होतं,, एकंदरीत किती पैसा लागेल, कसं याची आखणी करावी लागेल,
आता सर्व तयार होतं,
मनाशी तर निर्धार केलाच होता, फक्त आता गरज होती ती सर्वांसोबत सांगून सुरवात करण्याची, आता मला झोप येत नव्हती, महोत्सव डोळ्यासमोर दिसायला सुरवात झाली होती...
खूप मोठं काम हाती घ्यायला निघालो होतो, पण खूप मोठं आहे हे मात्र कुणाला सांगायचं नव्हतं, परतीच्या प्रवासातच कॅनडा च्या FILM FREE WAY या कंपनी सोबत करार करण्यासाठी मेल पाठविला होता, त्यांनी पण तुमची संपूर्ण माहिती पाठवा म्हणून परत मेल केला होता,, रात्री 10:30 वाजता ठाण्यात पोहचलो होतो, महा भयंकर पाऊस पडत होता,, दिल्लू बाबा अंधेरी स्थानका वर आमची वाट पाहत होता, पावसामुळे ट्रेन बंद झाल्या होत्या, खूप थकवा आला होता, डोक्यात फक्त फेस्टिवल फिरत होत, रात्री 2 वाजेपर्यंत घरी पोहचलो, पण झोप काही येत नव्हती, आता मला झोपायचं नव्हतं ही, सकाळ झाली रविवार होता, बायकोनि झोपण्याचा आग्रह करत होती, पण आता झोप येणं शक्य नव्हतंच, सगळ्यांना फोन केला आपण असं करतोय हे सांगितलं, सर्वाना याची थोडी थोडी कल्पना होतीच,
नाव आधीच ठरवलं होतं
"कला-समृध्दी"
या पुढे आधी सर्वांनि राष्ट्रीय (म्हणजे फक्त भारता पुरता मर्यादित) करूया असा सल्ला दिला,,
पण मी म्हटलं करायचं तर आंतरराष्ट्रीय च मग झालं
"कला-समृध्दी आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सव"
माझ्या पद्धतीने जाहिरात करायला सुरुवात केली , सर्वांची मीटिंग झाली, येणाऱ्या DVD कुठे येतील हा विषय होता, नंतर ते सुरज ने हाती घेतलं आणि त्याचा ऑफिस वर सर्व DVD जाण्याच ठरलं,, आज 22 जून होता, आज पासून आपली महोत्सवाचे एन्ट्री सुरू झाली होती, सर्वजण तैयार होते आता चित्रपट येण्यास सुरुवात झाली होती, सर्वात पहिला चित्रपट होता
हिजडा (शाप की वरदान) ,, आता पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कला समृध्दी पोहचली होती, फोनवर बोलण्याची सर्व जबाबदारी मी माझ्याच हातात ठेवली होती, माझ्या दोन नंबर नंतर तिसरा नंबर सुरज चा आणि नंतर दिल्लू आणि राज,
काम सुरू झालं होतं, आता महत्वाचा भाग होता Auditoriam शोधा शोध सुरू होती, आता आपल्या कुटुंबात आणखी एक व्यक्ती सामील झाला होता, सुनील क्षीरसागर तोही आपल्यासारखाच वेडा होता, सदैव पाठीशी खंबीर पणे उभा असणारा प्रतीक नेहमीच पाठीशी उभा होता च,, सुनील साहेबासोबतच आता डेव्हिड दादाचा पण आपल्या कुटुंबात प्रवेश झाला होता,,सर्वजण आप आपल्या परीने कामाला लागले होते, सुनील आणि डेव्हिड दादा ने हॉल मिळविण्याची जबाबदारी स्वीकारली होती,,
हॉल चे नाव फायनल होताच कॅनडा च्या कंपनीने सुद्धा होकार दिला होता, आता बाहेर च्या देशातून पण चित्रपट यायला सुरुवात झाली होती,,
आता पर्यंत 100 हुन अधिक चित्रपट येऊन पोहचले होते,
आता माझी भीती वाढत होती, महोत्सव आपण ठरविल्या पेक्षा खूप मोठा होत आहे याची कल्पना झाली होती,, आता पर्यंत 10 पेक्षा जास्त देशातील चित्रपट सहभागी झाले होते, दिवसभर कामं करायची, रात्री सर्वांनि कॉन्फरन्स वर बोलायच , शुक्रवारी आणि शनिवारी माझ्या घरी सर्वांनी संपूर्ण रात्र, रात्र चित्रपट पहायचे, असा क्रम चालू होता, सर्वजण रात्र रात्र जागायचं सुरज काम संपवून अंधेरी ते भायंदर आणि सकाळी परत घरी .. दिल्लू बाबा प्रत्येक शनिवारी रात्री सोबत असायचं पण कधी घोरायला सुरवात होईल याचा काही नेम नसायचा, राज दिवस भर आटो चालऊन दमून जायचा पण रात्र भर जागी असायचा, सर्वांकडे बघून खूप वेळा अभिमान वाटायचा की मी या कुटुंबाचा प्रमुख आहे,, आतापर्यंत मी आपल्या कुटुंबात किरण आणि स्नेहा ला सामावून घेतलं होतं, ते माझ्याच ऑफिस मध्ये असल्या मुळे मला त्यांची क्षमता त्यांचं वागणं सर्व माहीत होतं , फक्त त्यांना कल्पना देऊन ठेवली होती, त्यांनी ही होकार दिला होता,, सुरवाती पासूनच विनय नि संपूर्ण जबाबदारी हाती घेतली होती, डिजिटल मार्केटिंग साठी लागणारे सर्व पोस्टर्स वगैरे सर्व तयार करून सगळीकडे पसरवत होता,,
आता पर्यंत महोत्सवाची तारीख नक्की झाली होती 1 ऑक्टोबर 2018..
कधी तामिळनाडू हुन तर कधी केरळ, तर कधी कोलकाता, तर कधी भोपाळ वरून चित्रपट येत होते, खुप लोकांचे आभार मानणारे, तर कधी धमकी देणारे फोन येत होते,,
भीती कधी वाटतच नव्हती फक्त महोत्सव डोळ्यासमोर दिसत होता, झोप डोळ्या पासून लांब गेली होती, आता पर्यंत 200 पेक्षा जास्त चित्रपटाचा सहभाग आणि जवळ जवळ 30 देशांचा सहभाग झाला होता,
आता महोत्सव 20 दिवासावर आला होता सर्व तयारी जोरात चालू होती आधीच सर्वांनि पैसे काढले होते, आणखीन ही पैसे लागणार याची मी सर्वाना कल्पना दिली होतीच,सर्वजण तयार होते..
सारखे न झोपल्यामुळे माझी प्रकृती थोडी थकली होती, डोकटरकडे जाणं गरजेचं होतं..
डोकटरकडे गेलो त्यांनि माझं डोकं साधारणपणे ज्या वेगाने काम करायला पाहिजे त्या पेक्षा 5 पटीने जास्त धावते असं सांगून औषधी सुरू केली होती,, मला याची काही चिंता नव्हती, काम सर्व सुरळीत चालू होतं, बऱ्यापैकी सर्व सुरळीत चालू होतं,, महोत्सव 10 दिवसांवर येऊन उभा होता, सर्वजण तयारच होते.. कार्यक्रमात सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपटाची नायिका करणार होती,, तिला खास प्रशिक्षण देण्यासाठी मी औरंगाबाद हुन मुंबईला बोलावून घेतलं होतं,, सोमवार चा दिवस होता मी कामावरून सुट्टी घेऊन तिला काही गोष्टी सांगण्यासाठी मीटिंग ठरवली होती,, मीटिंग सुरू होती तिचा फोन सायलेंट होता,, माझ्या फोनवर कुणाचा तरी कॉल येत होता, खिशातून फोन काढला तर माझ्या मिसेस च्या बॉस चा नंबर दिसला, कॉल उचलला समोरून जे ऐकलं त्यांनि डोक्याला मुंग्या आल्या सारख झालं, त्यांनी सांगितलं की सुनीता ची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे, आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे ,, तुम्ही लवकर या. इकडे तिकडे फोन करून काही जणांना हॉस्पिटल ला पोहचायला सांगितलं,
त्या दिवशी त्या मुलीशी बोलणं राहून गेलं.. रात्री पर्यंत बायकोला घरी आणलं होतं, तिला माझी गरज होती, सोबत असंन गरजेचं होतं, रात्री मी तिच्या सोबत होतो, थोडी प्रकृती ठीक असल्याच सांगत होती, रात्रीचे 1:30 वाजला होता, मी बसून काही काम करत होतो,, अचानक जाणवलं की माझी मिसेस मला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते ,, पण ती बोलू शकत नव्हती फक्त रडत होती, चेहरा पूर्ण वाकडा झाला होता,, तिच्या शरीराचा संपूर्ण अर्धा भाग काम करत नव्हता, तिला घट्ट मिठी मारून मी सोबत आहे,मी सोबत आहे घाबरू नको म्हणून सांगत होतो,खरंतर आमचं लव मॅरेज , मी एकटा तिच्या सोबत असलो की अक्खा जग तिच्या सोबत असल्याचा तिला धीर असतो, काही वेळात ती शुद्धीवर आली, लगेच तिला घेऊन जवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये गेलो रात्रीचे 2 वाजले होते, मला या गोष्टीची कदाचित आधीच अंदाज होता, सुनील साहेबाची
बाईक सोबतच आणली होती,, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याने ct scan करण्याचा सल्ला दिला,, पण तेवढ्या रात्री त्यांच्या कडे ती सुविधा उपलब्ध नव्हती,, लगेच बायकोला बसवलं आणि कूपर हॉस्पिटल गाठलं,, रात्रीचे 3 वाजले होते,, हॉस्पिटलमध्ये तातडीने CT SCAN.. MRI केला,, सकाळ पर्यंत सर्व झालं होतं, आजचा माझा न झोपण्याचा तिसरा दिवस होता,,, सकाळी मिसेस ला घरी सोडल आणि कामाला लागलो,, आता प्रत्येक वेळा फोन आला की काय बातमी येते याची भीती वाटत होती,, घड्याळीत 11 वाजले होते,, सुनील सोबत बाहेर सिगरेट पित होतो,, फोन वाजला, माझ्या एका मैत्रिणी चा फोन होता, फोन उचलला तर समोरून तिच्या आवाजाने आजून एक बातमी दिली, जी मुलगी निवेदन करणार होती, तिच्या वडिलांना हृद्यरोगाचा तीव्र झटका आल्याचं सांगितलं, आता तिला जाणं गरजेचं होतं,,
मला त्याची चिंता नव्हती, फक्त आता यानंतर कसली न्यूज ऐकायला येणार याची मी वाट पाहत होतो. मुंबईला आलेल्या काळात फूटपाथ पासूनच जीवन पाहिल्या मुळे आलेल्या प्रत्येक गोष्टीचा सामना कसा करायचा हे मला परिस्थितिने चांगलंच शिकवलं होतं,,
म्हणून मी नेहमी म्हणतो आपन सर्वांनी सुद्धा हे लक्षात ठेवाच.
(जेव्हा आपल्या आयुष्यात, खूप जास्त संकट येतील,समजून जा की तुम्हीच यशाच्या खूप जवळ आहात, तेव्हा फक्त आपलं डोकं शांत ठेवा, जास्त ऐका, आणि कमी बोला,
ही आजची संकटा उद्या च्या आपल्या यशाच्या किल्ल्या आहेत ,)
सिगरेट संपऊन चालत चालत आम्ही ऑफिसच्या गेट वर पोहोचलो होतो,, फोनवर एक msg आला होता, ओपन केला तर तो एक झटका होता, जो मुलगा आपल्या संपूर्ण पोस्टर ते एडिटिंग सर्व करणार होता, त्याच्या भावाचा अपघात झाला होता,,
एकामागून एक संकट प्रहार करत होते,, मी मात्र शांत होतो,, लोकांच्या आलेल्या फोन्स ना शांतपणे उत्तर देत होतो, तिकडे सूरज च्या मुलाला डेंगू झाला होता,,
मिसेस ला कुणीतरी ऍडमिट केलं होतं,, मी म्हटलं पैश्याची चिंता नको करू जे टेस्ट सांगतील त्या सर्व टेस्ट कर,, तिच्या एक एक टेस्ट चालू होत्या,,
मला त्रास होऊ नये म्हणून मिसेस तिच्या मम्मि कडे तीन दिवस राहायला गेली,, महोत्सव संपल्यावर ऍडमिट होण्याचा निर्णय तिने घेतला होता,,
घरी गेल्या नंतर हळूच माझी मुलगी मिठीत यायची आणि
हक्काने सांगायची पप्पा
कला-समृद्धी खूप छान होईल ना मी का? असं विचारल्या वर ती हसत सांगायची की एवढे सारे अंकल किती सारं काम करतायत मग छान तर होणारच ना..
आपल्या सर्वांची मेहनत माझ्या इवल्याश्या मुलीला पण जाणवत होती,
दोन तीन दिवस अगोदरच मी स्नेहा ला अँकरिंग बद्दल सांगितलं होतं, तिनी पण माझा मान ठेऊन लगेच होकार दिला होता, सुट्टी नाही दिली तरी मी घेईनच मग काम सुटलं तरी चालेल इथं पर्यंत तैयार झाली होती, सचिन, सुशांत, प्रतीक सर्वजण आपल्या आपल्या परीने कामावर लक्ष देतच होते,,
आज माझा जवळ जवळ 5 दिवस होता न झोपल्याचा,,
आजचा आपल्या हातातला शेवटचा दिवस होता,, साई त्याची टीम घेऊन हॉटेल वर पोहचला होता,, त्याच्या अगोदरच्या रात्री मी राज दिल्लू सुरज सर्वांनी हॉटेल चि पाहनी केली होती,
रात्री माझ्या घरात काम करताना हॉटेल च्या बाबतीत काही अडचणी होत्या,मी सकाळी 5 वाजता हॉटेल गाठलं,
इथून पण तोडगा निघाला, सर्वांनी 12 वाजता भेटण्याच ठरवलंच होतं,, आता पर्यंत काही पाहुण्यांच आगमन झाल होत,,
संपुर्ण टीम 2 ते 3 वाजेपर्यंत पोहचली, ज्यांनि त्यांनी जे जे जमेल ते काम केलं, विनय असो, अमर ,असो प्रतीक ,सुरज,किरण राज ,दिल्लू सर्वांची आपल्या आपल्या पद्धतीने कामं रात्री 2 वाजेपर्यंत केली, रात्र कशी काढली याची सर्वाना आठवण नक्की च आठवण राहील, मी आणि दिलीप सकाळी 5 वाजता प्रभोधन ला गेलो तर डेव्हिड, आणि सुनील दादाची टीम काम करतच होती, संपूर्ण दिवस रात्र बॅनर बनविण्या पासून ते लावण्या पर्यत च संपूर्ण काम सुनील आणि डेव्हिड दादांनी घेतलं होतं आणि पारही पाडलं,
आता दिवस उगवला होता,, मागच्या 3 महिन्याची मेहनत आणि आज खरी परीक्षा होती,
मला भीती वाटत होती की मी कदाचित चक्कर येऊन पडेल का कारण 1 आठवडा जवळ जवळ मी झोपलो नव्हतो,, पण हाती घेतलेल् कामं पूर्ण केल्याशिवाय यमराज पण मला नाही उचलू शकणार याची मला पूर्ण खात्री होती.. अंगात पण पूर्ण दैवी शक्ती होती,,
महोत्सव सुरू झाला, ऐन वेळी लागलेले सर्व पैसे प्रत्येकाने जसे होईल तसे दिले,, कुणी किती पैसे दिले हे अद्याप कुणालाच माहित नाही, कदाचित सुरज ला माहीत असेल तरच कारण तो account बघतो,,
जेवढे होतील तसे सर्वांनि पैसे दिले,, महोत्सव पूर्णपणे संपला होता .. आता मात्र मला कुठे तरी जाऊन बसायचं होतं, काहीवेळ वर बघून आई भवानीचे आशीर्वाद मानायचे होते,,
मी माझ्या बात्तकु परिवाराला कला समृध्दी च्या रूपाने एक पाऊल पुढे घेऊन जाण्यात यशस्वी झालो होतो..
सर्वांच्या चेहऱ्यावर असलेलं सुख मी अलगत पणे, माझ्या डोळ्यात टिपत होतो, प्रत्येकाच्या घरातील मंडळींच्या चेहऱ्यावरील न सांगणारे कौतुक मी सहज सर्वांच्या चेहऱ्यावर पाहत होतो,, माझ्या मुलाने, माझ्या नवऱ्याने, माझ्या पप्पाने, माझ्या मित्राने, माझ्या मैत्रीनेने केलेल्या ह्या कामाबद्दल त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान माझं मन प्रसन्न करून जात होतं.. आज खऱ्या अर्थाने एका मेहनती कुटुंबाचा कुटुंब प्रमुख असल्याचा मला आनंद वाटत होता..
सर्व अगदी व्यवस्थित पार पडलं होतं, निवांत हॉटेल मध्ये गेल्यानंतर काही वेळातच त्यांना निचिंतपणे झोपतांना पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं,,
किती तरी दिवसांनी माझे वाघ आज निवांत झोपलेले पाहून आज मन भारावून आलं होतं..
हातात छानसा बिअर चा ग्लास भरून हॉटेल बाहेरून निवांत बसून आकाशाच्या लक्ख प्रकाशात एक प्याला मद्य पित होतो,,
अशीच आई भवानी शक्ती देत राहो.
नक्कीच माझ्या या परिवाराला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल हा माझा शब्द आहे..
ही आपली कला-समृध्दी आणि आपलं हे अव्यक्त प्रेम असंच राहो,,
आपल्या या अतूट, निस्वार्थी प्रेमाबद्दल मी आपल्या सर्वांचे मनस्वी आभार मानतो..
2019 मध्ये तब्बल 72 देशाच्या 400 पेक्षा जास्त सिनेमाने यात सहभाग नोंदविला होता, आणि मुंबईच्या बांद्रा परिसरात अनेक दिग्गज बॉलीवूड, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार ही पडला..
आज चार वर्षांनंतर आम्ही लावलेल्या छोट्याश्या रोपट्याचं आपली सर्वांच्या प्रेमाने आशीर्वादाने एका वटवृक्षात रूपांतर झालं आहे..
येणाऱ्या काळात नक्कीच जास्तीत जास्त कलाकार कसे घडविता येईल.त्या साठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू.
धन्यवाद🙏🏼🙏🙏🏼
रमेश पवार
( संस्थापक अध्यक्ष)
9930441312


