shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"नातं" कवी आकाश सुपारे



जो भेटल त्याच्यात गुंतत गेलो
घुंगरु सम नात्यात वाजत गेलो

ना कळलो मी मलाच ना जग कळले
विमुक्त होवुन मी कवितेत जगत गेलो

छळले जरी असेल ह्या असहाय जखमांनी
प्रत्येक जखमेवर मी मिठ चोळत गेलो

जुन्या आठवणी माझ्या काळजात दाटुन आहे
मुखवटे फाडुन मी चेहरे वाचत गेलो

आज आहे जरी ईथे मी उद्याचे माहीत नाही
 होते जरी काटे, मी फुले समजुन चालत गेलो

भावनाचा मी कधि बाजार केला नाही
माझ्याच वेदनेला मी मिञा सम वागत गेलो

द्यायचेच तर सुखाचा एखादा पॅक दे भरुन
असेही दुख्खाचे खंबे कोरेच पचवत गेलो

आले कीती गेले किती संपर्कात माझ्या
एकटाच मैफलित माझ्या गातच गेलो

आजही मी तसाचा आहे बदललो नाही
माझ्याच सरनावर मी बेधुंद नाचत गेलो

जो भेटेल त्याच्यात गुंतत गेलो
घुंगरु सम नात्यात वाजत गेलो


आकाश सुपारे....
९८२२५१०२५४
close