shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनुसूचित जातीतील व्यक्तींच्या वारसदारांना व्यवसायासाठी ५ लाख रुपये कर्ज योजना..!!



अर्ज करण्याचे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे आवाहन

 अहमदनगर : जिमाका
एन.एस.एफ.डी.सी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास  महामंडळ यांच्या मार्फत कोविड-19या जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटूंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटूंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी  सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ढ इनडिव्हीज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड ॲंन्ड इंटरप्राईज(SMILE) ही कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. या योजनेत प्रकल्प मुल्य रुपये 1 लाख ते 5 लाखापर्यंत असणे अपेक्षित आहे. 

त्यामध्ये एन.एस. एफ.डी.सी. सहभाग 80 टक्के व भांडवली अनुदान 20 टक्के  असे आहे. व्याज दर 6 टक्के प्रमाणे असून परतफेडीचा कालावधी 6 वर्षे आहे. कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे 15 जून 2021 पर्यंत मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील (एससी) कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवाhttps://forms.gle/7mG8CMecLKnWGt6K7 ह्या लिंकवर दिनांक 30 जून 2021
पर्यंत भरावी, असे  असे जिल्हा व्यवस्थापक,महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. अहमदनगर यांनी कळविले आहे.

 
या योजनेत सहभाग नोंदविण्यासाठीची पात्रता खालीलप्रमाणे आहे.- अर्जदार अनुसूचित जातीतील असावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाख पर्यंत असणे आवश्यक आहे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा. (कुटूंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक). मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाची मिळकत कुटूंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरीता आवश्यक कागदपत्रे महानगर/नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र. स्मशानभूमी  प्राधिकरणाने दिलेली पावती अथवा एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकार्‍यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असेल.

 तसेच अर्ज करताना मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (3 लाखापर्यंत), कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला. रेशनकार्ड, वयाचा पुरावा आदी बाबतची कागदपत्रे आवश्यक असतील.
close