shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थिती मध्ये इंदापूर तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा..!!

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थिती मध्ये इंदापूर तालुक्यातील कोरोना स्थितीचा  आढावा..!!
इंदापूर प्रतिनिधी:  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इंदापूर कार्यालयात  कोरोना आढावा बैठक बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थिती मध्ये इंदापूर तालुक्यातील कोरोना स्थितीचा सर्व आढावा (दि.१७ जून २१) रोजी जाणून घेतला .यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. 
याप्रसंगी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट ,डॉक्टर सुहास शेळके, इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी ,डॉक्टर नामदेव गार्डे यांनी माहिती दिली.
यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले,की कोरोना कालावधीत इंदापूर तालुक्यातील सर्व  अधिकाऱ्यांनी उत्तम कर्तव्य बजावले. शासनाचे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात  पोलीस अधिकार्‍यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,आशा सेविका, शिक्षक व इतर सर्व कर्मचारी आणि प्रमुख अधिकारी या सर्वांनी जीवाचं रान केल्यामुळे कोरोनाची लढाई आपण चांगल्यापैकी जिंकलो असलो तरीही अद्याप कोरोना पूर्ण हद्दपार झाला नसल्याने जनतेने काळजी घ्यावी,नियमाचं पालन करावे असे आवाहन राज्यमंत्री भरणे यांनी केले.
 
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,तहसीलदार अनिल ठोंबरे, गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, डॉ.सुहास शेळके,डॉ.प्रशांत महाजन,डॉ.नामदेव गार्डे,पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, जीवन माने, बिरप्पा लातुरे,दिलीप पवार,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, युवकाध्यक्ष शुभम निंबाळकर,युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ,नगरसेवक,विविध पदाधिकारी उपस्थित होते.


 
.

  लोकडाऊन कालावधीत इंदापूर तालुक्यामध्ये आँनलाईन योगदान दिलेल्या सावित्रीच्या लेकी या पुस्तकाचे अनावरण खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. मार्च २०२० पासून तालुक्यातील सर्व शाळा लाॅक डाऊन मध्ये अचानक बंद झाल्या,शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली, त्याच कामाचा प्रेरणादायी आढावा सावित्रीच्या लेकी या पुस्तकात रेखटला असून खासदार सुळे यांनी या पुस्तकाचा  कौतुक केले.
close