shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचे हस्ते करमाळा शहरातील डांबरी रस्त्याचे भूमिपुजन..!!

शहरात होणाऱ्या विकास कामांमूळे नागरिक समाधानी...

प्रतिनिधी : आसावरी वायकर

करमाळा :(दि .१७ ) :शहरात नगरपालिकेच्या विकास कामांचा धडाका सुरु आहे .महात्मा गांधी पुतळा  ते  निलजरोड नवीन डांबरी रस्त्याचे  नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.                

                               
शासनाच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शहरांतर्गत विविध रस्त्यांपैकी  महात्मा गांधी पुतळा ते निलजरोड या डांबरी रस्त्याचे  भूमीपूजन अर्थात शुभारंभ नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या शुभहस्ते  तर उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, नगरसेवक ॲड . नवनाथ खुंडे,डॉ. मनोज कुंभार, संजय पडवळे यांच्या उपस्थितीत पार पडला.


करमाळा शहरात शासनाकडून नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांसाठी शासनाच्या नगरविकास खात्याकडून तब्बल १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यापैकी ९ कोटी ७६ लाख ९३ हजार ९०९ रू. निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमधून टप्प्या-टप्प्याने शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण करून पक्के केले जाणार आहेत. त्यामूळे शहर आणखी आकर्षक व सुंदर बनणार आहे. 

करमाळा शहरात होत असलेल्या विविध विकास कामांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले .

यावेळी   बाळासाहेब बलदोटा,तानाजी कुकडे, शेखर इंदूरे, ज्योतीराम ढाणे,  ,बाळासाहेब कांबळे, देविचामाळचे सरपंच श्री.सोरटे,गणेश कुकडे, विनोद कुकडे, अक्षय जाधव, नंदू शेरे, पप्पू ओहोळ, सर्व नगरसेवक, सर्व ठेकेदार व जगताप गटाचे कार्यकर्ते आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
close