shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर चे विक्रमसिंह मोरे यांची भाजप सोशल मीडिया उपाध्यक्षपदी निवड

वालचंदनगर चे विक्रमसिंह मोरे यांची भाजप सोशल मीडिया उपाध्यक्षपदी निवड
इंदापूर प्रतिनिधी: वालचंदनगर येथील उच्चशिक्षित युवक व माजी सरपंच छायाताई मोरे यांचे सुपुत्र विक्रमसिंह मोरे यांची आज भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र (दि.११ जून २१) रोजी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शरद जामदार यांच्या हस्ते देण्यात आले.
 यावेळी इंदापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख साहेबराव पिसाळ व भाजप चे इंदापूर शहराध्यक्ष शकील भाई सय्यद  उपस्थितीत होते.

याप्रसंगी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा असल्यामुळे या पदांना खूप महत्त्व आहे. सध्याचे युवक वर्ग हा सोशल मीडिया वरती खूप प्रभावी आहे असे त्यांनी मत व्यक्त केले व त्यांनी या नियुक्तीवरून  शुभेच्छा दिल्या.
यावेळी विक्रमसिंह मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त परत म्हणाले की, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांनी जो विश्वास दाखवला आहे .त्यावरती नक्कीच चांगल्या प्रकारचे यश संपादन करू . हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या कामाचे तालुक्यातील जनते पर्यंत सोशल मीडिया त्याच्यामार्फत  तालुक्यातील जनतेपर्यंत पोचवू .
close