बावडा येथे राजवर्धन (दादा) युवामंच शाखेचे उद्घाटन.
इंदापूर प्रतिनिधी:दि.११ जून २०२१ रोजी बावडा येथे राजवर्धन (दादा) युवामंच शाखा नंबर एक चे उद्घाटन बावडा गावचे सरपंच किरण पाटील, नीरा-भीमा कारखान्याचे माजी संचालक विकास पाटील व नवनाथ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी सरपंच किरण पाटील म्हणाले की, राजवर्धन दादा पाटील युवा मंच या शाखेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करतो .आपल्या तालुक्याचे युवारत्न बावडा गावचे आशास्थान नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन दादा पाटील, विकास पाटील, नवनाथ पवार यांच्या उपस्थितीत दत्तनगर येथील शाहरुख शेख या युवकाने व येथील ग्रामस्थ युवक यांनी पुढाकार घेऊन आज आपल्या गावात युवा मंचची पहिली शाखा स्थापन केली. त्याबद्दल बावडा गावचे सरपंच या नात्याने अभिनंदन करतो .इथून पुढे युवामंचा द्वारे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर असतील सामाजिक उपक्रम राबवावेत आम्ही ग्रामपंचायत च्या वतीने सर्व प्रकारचे मदत करू असे त्यांनी मत व्यक्त केले.
भाजप सोशल मीडिया उपाध्यक्ष शशिकांत जाधव यांनी मत व्यक्त करताना म्हणाले की, राजवर्धन युवामंच हा तालुक्यातील युवारत्न राजवर्धन पाटील यांच्या नावाचा आहे. ज्या बावडा गावचे नाव देशात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे ओळखले जाते. त्यांच्या सुपुत्राच्या नावाने काढलेल्या युवा मंचाला कोणतेही प्रकारचे गालबोट न लागता सामाजिक संस्कृती व इतर समाज उपयोगी कार्य चांगल्या प्रकारे करावे . आपल्या नेतृत्वाचे नाव उज्वल होईल हे लक्षात घेऊन कार्य करावे .माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंबीरपणे आपली कामे केली जातील. आपल्या भूमीत बावडा गावात राजवर्धन दादा युवामंची स्थापना प्रथमच केली आहे. असेच इंदापूर तालुक्यात ही शाखा मोठ्या उत्साहाने झाल्या पाहिजेत अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे माजी संचालक विकास पाटील, नवनाथ पवार, रंजीत घाडगे, सुरज माने व युवा मंचाचे संस्थापक शाहरुख शेख, अध्यक्ष आशिष सरवदे ,उपाध्यक्ष इब्राहिम शेख, कार्याध्यक्ष अजित जाधव ,सरचिटणीस ओंकार घाडगे व युवा मंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

