निरा भिमा कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर
-१५जून पासून लागवडीस सुरुवात
इंदापूर: प्रतिनिधी( दि.११ जून २१)
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवड हंगाम सन २०२१-२२साठी ऊस लागवडीचे धोरण कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी जाहीर केले. त्यानुसार ऊस उत्पादक शेतक-यांनी जास्तीत जास्त क्षेञावरती नमूद केलेल्या वाणांची लागवड करावी व प्रति एकरी ऊस उत्पादनात वाढ करावी,असे आवाहन त्यांनी केले .
कारखान्याचे ऊस लागवडीचे धोरण पुढीलप्रमाणे-
1) आडसाली-
लागवड कालावधी - १५जून ते ३१ ऑगस्ट, दिवस ७७, (लागवडीचे क्षेत्र १५ टक्के)- फुले ०२६५
दि. १ जुलै. ते ३१ ऑगस्ट, दिवस ६१ (लागवडीचे क्षेत्र १५ टक्के)- को.८६०३२ व व्ही.एस.आय.८००५
2) पूर्व हंगाम - ( लागवडीचा कालावधी -१सप्टें. ते ३० नोव्हें., दिवस ९१ (लागवडीचे क्षेत्र ३० टक्के) -कोसी ६७१, को.८६०३२, व्ही.एस.आय.८००५, एम.एस.१०००१, व्ही.एस.आय.४३४
3) सुरु - ( लागवडीचा कालावधी -१डिसें. ते ३० एप्रिल, दिवस १५१ (लागवडीचे क्षेत्र १५ टक्के) -कोसी ६७१, को.८६०३२, व्ही.एस.आय.८००५, एम.एस.१०००१, व्ही.एस.आय.४३४
४) खोडवा- (कारखाना सुरू झालेपासून ते बंद होईपर्यंत (लागवड क्षेत्र ४० टक्के)- वरील सर्व वाण.
याप्रमाणे शेतकऱ्यांनी ऊस लागवड पूर्ण होताच त्या क्षेत्राची नोंद त्याच दिवशी शेतकी विभागाकडे देणे आवश्यक आहे. तसेच जेवढ्या क्षेत्राची लागण पुर्ण झाली आहे, तेवढ्यात क्षेत्राची लागण तारीख ग्राह्य धरली जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
तसेच ऊस तोडणी कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना ऊस लागवड तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार कोसी ६७१, व्ही.एस.आय.४३४ व एम.एस.१०००१ या लवकर पक्व होणा-या व जादा साखर उतारा असणा-या ऊस जातींची प्राधान्याने तोडणी करण्यात येईल. त्यानंतर को.८६०३२ व व्ही.एस.आय ४३४ या ऊस जातीची व त्यानंतर फुले ०२६५ या ऊस जातीची तोडणी ही लागवड तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार करण्यात येईल,असेही त्यानी नमूद केले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, ऊस उत्पादक शेतक-यांनी योग्य बेणे निवड, बेणे प्रक्रिया, लागवड पध्दती, रोपे लागण पध्दत, रासायनिक खतांच्या माञा, ठिबक मधून द्यावयाची खते, किड व रोगांचे नियंत्रण या प्रमाणे ऊस उत्पादनाचे तंञ वापरून प्रति एकरी किमान १०० टन उस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवावे.
कारखान्याकडून ऊस विकास योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. त्यानुसार बेणे पुरवठा, माती परीक्षण प्रयोगशाळा यांचा ऊस उत्पादक शेतक-यांनी लाभ घ्यावा. तसेच कारखान्याचे कृषिरत्न या दर्जेदार सेंद्रिय खताचा वापर ऊस उत्पादक शेतक-यांनी करावा, असे आवाहनही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी केले .
यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जमादार, कार्यकारी संचालक डी.एन.मरकड उपस्थित होते.

