सांगली । प्रतिनिधी (अनिल पोवार ) :
अंत्री बुद्रुक (ता शिराळा) येथील माजी उपसरपंच सुनिल पाटील आणि त्यांचे बंधु माजी सैनिक भगवान पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतुन वडिलांच्या स्मरणार्थ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास चाळीस हजारांचे वैद्यकीय साहित्य दिले.
माजी उपसरपंच सुनिल पाटील व माजी सैनिक भगवान पाटील यांचे वडील शामराव दादू पाटील यांचे निधन झाले. कोरोनाची परिस्थिती गंभीर असून शासन निर्देश आणि लॉकडाऊन याचा विचार करता त्यांनी रक्षाविसर्जन, दहावा आणि तेरावा हे सर्वच विधी अत्यंत साध्या पद्धतीने घेवुन सामाजिक बांधिलकी जपत रक्षाविसर्जन वृक्षारोपण करून केले.
दहावा आणि तेराव्याचा खर्च टाळून गावतील प्राथमिक आरोग्य केंद्राला चाळीस हजाराचे वैद्यकीय साहित्य देऊन नवीन आदर्स निर्माण केला आहे.

