shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुकडी घोड विसापूर व सिना धरणा तील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्वरीत पाणी मागणी अर्ज करावा- शेलार..!!

प्रतिनिधी.स्नेहा उत्तम मडावी
कुकडी, घोड, विसापूर व सीना धरणाचे आपल्या हक्काचे पाणी अबाधित  ठेवण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्वरित पाणी मागणी अर्ज भरून पाणीपट्टी तातडीने भरावी अन्यथा पाणी प्रश्नी कधीही भरून न येणारे नुकसान होईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व कालवा सल्लागार समिती सदस्य घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.


भीमा उपखो-यातील जलसंपदा प्रकल्पांचे पुर्नर्विलोकन व पूर्ननियोजन करण्याकरिता शासनाने जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्री.अविनाश सुर्वे यांचे अध्यक्षतेखाली दि. २० मे २०२१ रोजी समिती स्थापन केली असून ही समिती भीमा उपखो-यातील धरणांचा व लाभक्षेत्रातील विविध बाबींचा अभ्यास करणार असून त्यात लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा "बदलता पाणी वापर व वास्तववादी सिंचन क्षमता" या बाबींवर अभ्यास होणार असून समिती हा अहवाल तीन महिन्यात शासनास सादर करणार आहे त्यात आपल्या लाभक्षेत्रात पाणी मागणी कमी आहे. 

या भागातून अपेक्षित महसूल मिळत नाही हे समितीच्या निदर्शनास आल्यास या भागात पाणी मागणी नाही म्हणून आपल्या वाट्याचे पाणी जाऊ शकते असे घडल्यास आपले कधीही न भरून येणारे नुकसान होणार असून भावी पिढी आपणाला कधीही माफ करणार नाही याचा गांभीर्याने विचार होणे नितांत गरजेचे आहे.
close