shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रसिद्ध गीतकार विनायक पवार यांना एकता फाउंडेशनच्या पुरस्काराचे वितरण..!

शिरूर । (दि.०९/०६/२०२१)(दीपक महाले):
सालाबादप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील मानूर येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या एकता मराठी साहित्य संमेलनातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रसिद्ध गीतकार विनायक पवार यांना नुकताच प्रदान करण्यात आला. 

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सुंदर गीतांच्या जोरावर अल्प काळातच प्रसिद्धीला आलेले विनायक पवार यांना शाल, पुष्पहार, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. ख्वाडा चित्रपटातील 'तुझ्या रूपाचं पडलंय चांदणं, मला भिजू द्या. गाणं वाजू द्या' या सुप्रसिद्ध गीताचे गीतकार विनायक पवार यांच्या 'नामुष्कीचे पिढीजात वर्तमान' या काव्यसंग्रहाला कै.विश्वनाथ शंकरराव पवार (से.नि.पोस्टमास्तर) राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

ख्वाडा बरोबरच बबन आणि छत्रपती शासन या चित्रपटांसाठी सुद्धा विनायक पवार यांनी गीतलेखन केलेले आहे. या वेळी एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, सचिव तथा पत्रकार गोकुळ पवार, कथाकार प्रा.डॉ.भास्कर बडे, पत्रकार अशोक भांडेकर यांच्यासह उपाध्यक्ष माही शेख, कोशाध्यक्ष शिवलिंग परळकर, राजेश बीडकर, व्यंगचित्रकार  दीपक  महाले, लखुळ मुळे, नितीन कैतके, साजिद भाई, अनिकेत कराड, डाॅ.स्नेहल कराड, श्रीम.लता बडे यांची उपस्थिती होती.
close