shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मार्केट कमिटी सचिव सुनिल शिंदे यांचा निरोप समारंभ- मा.आ.जयवंतराव जगताप यांच्या शुभहस्ते..!



 प्रतिनिधी । आसावरी वायकर :

  करमाळा (दि .७) :महाराष्ट्र राज्यात लौकीक असलेल्या तिन जिल्हयांच्या सिमेवर असलेल्या करमाळा कृषी ऊत्पन्न बाजार समितीचा २९ वर्षे सभापती म्हणून काम पाहत असताना शेतकरी हित समोर ठेवून व्यापारी, हमाल, तोलार यांना ही न्याय देण्याचे काम करत असताना गेल्या ३७ वर्षापासून सचिव सुनिल शिंदे यांनी मार्केट कमिटीमध्ये माझ्या सोबत काम पाहिले. 

त्यांनी प्रामाणिकपणे ,पारदर्शक अन् कार्यक्षम सचिव म्हणून काम केले त्यामूळे त्याचेच फळ म्हणून त्यांचा एवढा मोठा सन्मान अन् निरोप समारंभ होतो आहे. ते जरी प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत असले तरी ते अंतकरणातून मात्र कायम आहेत. त्यांनी येथून पूढे जगताप गटाचे कार्यकर्ते म्हणून कोर्टी परिसराची धूरा सांभाळावी असे मत मा.आ. जयवंतराव जगताप यांनी सचिव सुनिल शिंदे यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले मी नेहमी सर्वांना समान न्याय दिला आहे. सर्वसामान्यांना मोठमोठ्या पदांवर संधी दिली आहे. शेतकरी अन् व्यापारी हे मार्केट कमिटी चा पाया आहेत. त्यांच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे. त्यांच्या कोणत्याही अडचणी असल्या तरी आपण त्या सोडवण्यासाठी त्यांना 'बाहुबली ' सारखा भक्कमपणे पाठीशी आहोत. सचिव सुनिल शिंदे यांना उर्वरीत आयूष्य सुख -समृधीचे व आरोग्य दायी जावो अशा शूभेच्छा दिल्या तर नूतन सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी कार्यक्षम सचिव म्हणून वाटचाल करावी व शेतकरी व व्यापारी यांची उत्तम सेवा करावी मी तुमच्या पाठीशी आहे असे ते म्हणाले.  हा कार्यक्रम सटवाई फार्म हाऊस येथे पार पडला.  

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटसचिव दत्तात्रय शिर्के यांनी, सुत्रसंचलन प्रा. दत्तात्रय भागडे  यांनी तर आभार सामाजीक कार्यकर्ते आण्णासाहेब पवार यांनी मानले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ. जयवंतराव जगताप होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सत्कारमूर्ती माजी सचिव सुनिल शिंदे व विदयमान सचिव विठ्ठल क्षिरसागर यांचा जगताप गटाच्या वतीने मा. आ. जयवंतराव जगताप यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आले. 

तसेच भूसार व्यापारी असोशिएन, किराणा व्यापारी असोशिएन, तोलार संघटना, गटसचिव संघटना, डीसीसी बँक कर्मचारी संघटना,म. गांधी विदयालय, भैरवनाथ विद्यालय, उंदरगाव वि.का.से. सो, कोर्टी वि.का. से. सो,साडे वि.का. से. सो इ. च्या वतीने माजी सचिव सुनिल शिंदे व नूतन सचिव विठ्ठल क्षिरसागर यांचे सत्कार केले. या  प्रसंगी जयंत पाटील साहेब, सुजीत तात्या बागल, दत्तात्रय अडसूळ, नामदेव साबळे भाऊसाहेब व ॲड . कमलाकर वीर यांनी विचार व्यक्त केले. 

यावेळी व्यासपिठावर ॲड . कमलाकर वीर, माजी उपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप, माजी नगराध्यक्ष अमोद संचेती, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, सुजीत तात्या बागल, कृषी भूषण नामदेव साबळे, सरपंच दादा जाधव, माजी प.स. सदस्य रोहिदास सातव, नागनाथ लकडे, माजी उपसभापती दत्तात्रय अडसूळ, कृ.ऊ. बा. समिती संचालक औदुंबर दादा मोरे, मयूर दोशी, भूसार व्यापारी असोशियनचे अध्यक्ष विजयकुमार दोशी, सदाशिव पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दादा लबडे, काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस आण्णासो पवार, मार्केट कमिटीचे नूतन सचिव विठ्ठल क्षिरसागर, माजी सचिव दत्तात्रय क्षिरसागर, भारत शेठ क्षीरसागर, मिलींद दोशी, गटसचिव नेते बबन मेहेर, डीसीसी बँक पालक अधिकारी जयंत पाटील,आवटे साहेब, तात्या शिंदे,  डॉ. दिलीप कांबळे,रीटेवाडीचे सरपंच दादा कोकरे, विलास धुमाळ,शिवाजी राखुंडे, संजय ठाकर, शहाजी शिंगटे, म. गांधी विदयालयाचे प्राचार्य कापले पी.ए, भैरवनाथ विदयालयाचे मुख्याध्यापक माने सर, शंकर नलवडे, नंदु नलवडे, नवले, दादासाो सरडे, इ.सह भूसार व्यापारी असोशियनचे सर्व व्यापारी सदस्य, तोलार संघटनेचे सर्व सदस्य,डीसीसी बँक कर्मचारी संघटनेचे सर्व सदस्य, सचिव संघटनेचे सर्व सदस्य,म. गांधी विदयालय, भैरवनाथ विदयालयातील स्टाफ, विविध गावचे वि.का. से. सो.चे आजी -माजी चेअरमन, सरपंच, उपसरपंच, आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
close