shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"कथा जंगल च्या राजाची"


आपल्या सर्वांना ज्ञात आहे जंगलाचा राजा सिंह असतो.. सिंह हा सिंह च असतो.. जंगलाचे नियोजन व कारभारामुळे  प्रत्येक प्राणी पक्षी सिंहाला टरकून असतात.. 


एकदा सिंहाची दुसऱ्या जंगलात बदली होती.. नवीन सिंह मिळे पर्यंत जंगलात प्रतिनियुक्तीवर माकड येते.. माकड लवकरच सिंह होणार असते.. पण त्याला सिंहाचा अनुभव नसतो.

जंगलात येताच उपाशी गिधाड लांडगे कोल्हे असे उपद्रवी प्राणी प्रथम माकडाच्या भेटीला येतात.. तुम्ही सिंह होणार जंगलाचे राजे होणार.. तुमचा रूबाब वेगळा कालचे तुमचे जीवन उद्या वेगळे होणार...!

सिंह रूपी प्रतीनियुक्तीवर आलेले माकड खुष होते.. त्याला गिधाड लांडगे कोल्हेच इमानदार वाटू लागले.. हि उपाशी चांडाळ चौकडी हत्ती वाघ मोर हरीण इतर प्राणी पक्षांची चहाडी करू लागले... सिंहरूपी माकड प्रत्येक प्राण्याला हजेरीला बोलावू लागले.. सिंह माकडा सारखा आहे म्हणून जंगलात वार्ता पोहचली.. सिंह रूपी माकडाची माकड चाळे उपद्रवी उपाशी गिधाड लांडगे इतरांच्या आशिर्वादाने सुरू झाले..

इतर प्राणी एवढ्या मोठ्या जंगलात जीव मुठीत धरून वागू लागलेत.. जंगलाचे जनजीवन विस्कळीत झाले.. जंगलातील इमाणदार भित्रे प्राणी सिंहरूपी माकडाची डरकाळी ऐकूण घाबरायला लागले..

जंगलाचे संरक्षण करणारे फॉरेस्ट चे अधिकारी जंगलात फिरायला घाबरू लागले.. फॉरेस्ट अधिकारी सापळा लावण्या ऐवजी सिंहरूपी माकड व त्याचे उपद्रवी सहकारी फॉरेस्ट ऑफिसरलाच सापळा लावण्याचे नियोजन करू लागले

भित्र्या प्राण्यांनी कळपात रहाणे पसंत केले.. त्यांच्या समस्या ते सिंहरूपी माकडाला कळपाने सांगू लागले.. प्रत्येक कळपाच्या मोहरक्याला तो फस्त करू लागला.. जंगलात सिंह राज्या ऐवजी गिधाड लांडग्यांचेच राज्य आले..!

जंगलाचा राजा निवडताना माकडालाच काय उंदराला प्रतिनियुक्तीवर पाठवा.. पण त्याच्यात सिंह होण्याचे गुण तरी असावे.. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना आपल्या जंगलात आलेल्या सिंहरूपी माकडाला हाकलण्याचा अधिकार असावा.. किंवा माकडाला सिंहाचे प्रशिक्षण देऊन पाठवावे.

अशा सिंहरूपी माकडाचा वेळीच बंदोबस्त झाला नाही तर जंगलातील चांगले प्राणी स्थलांतरीत होतील.. जंगलात लांडगे गिधाड कोल्हे अशा उपद्रवी प्राण्यांची संख्या वाढेल  संचार वाढेल जंगल बदनाम होईल.. जंगल उध्वस्त होईल.. सिंहरूपी माकडाला दुसरे जंगल भेटेल देखील ..पण भविष्यात ह्या उध्वस्त जंगलात  चांगला सिंह येईल देखील याच्या जागेवर ...पण तो ह्या उपद्रवी जंगलातून पळ काढेल त्याला कारभार नकोसा होईल..!

पर्यावरण दिना निमित्त जंगलाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हा संदेश.. आज राज्यात अशी अनेक जंगले व अनेक सिंहरूपी माकडं आहेत.. जंगलाचे कायदे कुणीच पाळत नाही कसे होईल जंगलाचे व निरपराध प्राण्यांचे

संजय भास्करराव काळे
close